​अखेर अंकिता लोखंडेचे नशीब फळफळले! संजूबाबासोबत करणार बॉलिवूड डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 15:26 IST2017-06-01T08:50:53+5:302017-06-01T15:26:01+5:30

अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. कदाचित ही चर्चा खरी ठरण्याची चिन्हे आहेत. होय, टेलिव्हिजनवरील ...

Ankita Lokhande finally luck luck! Bollywood debuts with Sanju Baba !! | ​अखेर अंकिता लोखंडेचे नशीब फळफळले! संजूबाबासोबत करणार बॉलिवूड डेब्यू!!

​अखेर अंकिता लोखंडेचे नशीब फळफळले! संजूबाबासोबत करणार बॉलिवूड डेब्यू!!

किता लोखंडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. कदाचित ही चर्चा खरी ठरण्याची चिन्हे आहेत. होय, टेलिव्हिजनवरील या ब्युटिफुल गर्लने आपला पहिला बॉलिवूड चित्रपट साईन केल्याची जोरदार चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये आहे.  
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,संजय दत्तचा आगामी चित्रपट अंकिताने साईन केलाय. संजय दत्त लवकरच ‘मलंग’ नामक चित्रपटात दिसणार आहे. याच चित्रपटात अंकिताची वर्णी लागली असल्याचे कळतेय. अर्थात याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पण ही खबर खरी असेल तर बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर अंकिताचे नशीब फळफळले म्हणायचे. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून अंकिता अशाच एका ब्रेकच्या प्रतीक्षेत होती. सर्वप्रथम अंकिता शाहरूख खानसोबत ‘हॅपी न्यू ईयर’मधून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी खबर होती. पण ही खबर पुर्णत: खोटी ठरली. या चित्रपटात अंकिता नाही तर दीपिका पादुकोणची वर्णी लागली. यापश्चात संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’त अंकिता झळकणार, अशीही चर्चाही रंगली. पण ही चर्चाही केवळ पोकळ ठरली. पण आता ‘मलंग’मध्ये अंकिता दिसणार म्हटल्यावर अंकितासोबतच तिच्या चाहत्यांसाठीही ही आनंदाची बाब म्हणायला हवी.

ALSO READ : ​अंकिता लोखंडेने पोस्ट केला कुशाल टंडनसोबतचा फोटो!

‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोमध्ये अंकिता दिसली होती. यानंतर ती कुठल्याच शोमध्ये दिसली नाही. कारण अंकिताला बॉलिवूड डेब्यूच करायचे होते. अंकिताचे हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो,याच शुभेच्छा देऊ यात. अंकिता बॉलिवूडमध्ये आली तर आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकणार, हे नक्की आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते, ते आम्हाला नक्की कळवा.

Web Title: Ankita Lokhande finally luck luck! Bollywood debuts with Sanju Baba !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.