​अनिल कपूरच्या यशामागे आहे या अभिनेत्याचा हात... अनिलनेच दिली याविषयी कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 06:24 AM2017-12-22T06:24:56+5:302017-12-22T11:54:56+5:30

प्रत्येक कलाकाराच्या यशाच्या मागे कोणाचा ना कोणाचा तरी हात असतो. बॉलिवूडमध्ये कोणाचा पाठिंबा नसेल तर यश मिळवणे हे तितकेसे ...

Anil Kapoor's Yashamage is the hand of the actor ... Anilne has confessed about it | ​अनिल कपूरच्या यशामागे आहे या अभिनेत्याचा हात... अनिलनेच दिली याविषयी कबुली

​अनिल कपूरच्या यशामागे आहे या अभिनेत्याचा हात... अनिलनेच दिली याविषयी कबुली

googlenewsNext
रत्येक कलाकाराच्या यशाच्या मागे कोणाचा ना कोणाचा तरी हात असतो. बॉलिवूडमध्ये कोणाचा पाठिंबा नसेल तर यश मिळवणे हे तितकेसे सोपे नसते. अनिल कपूरने वयाच्या बाराव्या वर्षी तू पायल में गीत या चित्रपटात काम केले होते. पण हा चित्रपट काही कारणाने प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याने त्यानंतर काही वर्षांनी हमारे तुम्हारे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याची भूमिका ही खूपच छोटी होती. त्यानंतर त्याने काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. एक बार कहो, हम पाच, शक्ती यांसारख्या चित्रपटात त्याने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला सशक्त भूमिका मिळत नव्हत्या. अनिलला वो दिन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. या चित्रपटाने अनिलचे संपूर्ण करियरच बदलून टाकले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आजवरच्या त्याच्या कारकिर्दीत त्याने राम लखन, तेजाब, परिंदा, बेटा, 1942 अ लव्ह स्टोरी, लोफर, जुदाई, लाडला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या भूमिकांसाठी आजवर त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

anil kapoor anupam kher

आज अनिलने वयाची साठी उलटली असली तरी तो तितक्याच जोमाने चित्रपटात काम करताना आपल्याला दिसत आहे. आजही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत आहेत. त्याला आजवर मिळालेल्या या यशामागे एका अभिनेत्याचा हात असल्याचे अनिलने नुकतेच सांगितले आहे. झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनिलला मुबारकाँ या चित्रपटासाठी सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिलचे अभिनंदन करण्यासाठी अनुपम खेर यांनी एक ट्वीट नुकतेच केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की, डिअर अनिल, तुझे प्रत्येक वर्षं खूप चांगले जाओ. तू तुझ्या कामात खूप मेहनत घेतोस, आजकाल ही गोष्ट खूपच कमी कलाकारांमध्ये पाहायला मिळते. अनुपम खेर यांच्या या ट्वीटवर रिप्लाय देताना अनिलने लिहिले की, माझे आयुष्य आणि माझी कारकीर्द तुझ्या मैत्रीशिवाय आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्याशिवाय इतकी चांगली असूच शकली नसती. एक मित्र म्हणून तू माझ्यावर जो विश्वास दाखवलास त्यासाठी मी नेहमीच तुझा ऋणी राहील.
अनुपम आणि अनिलने त्यांच्या कारकिर्दीत लम्हे, हम आपके दिल में रहते है, बेटा, हमारा दिल आपके पास हे, 1942 अ लव्ह स्टोरी, लाडला, राम लखन अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 

Also Read : अनिल कपूरची ‘ही’ कृती बघताच घाबरले होते नेल्सन मंडेला, वास्तव जाणून घेताच घेतली गळाभेट!

Web Title: Anil Kapoor's Yashamage is the hand of the actor ... Anilne has confessed about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.