अनिल कपूरने आपल्या यशाचे श्रेय दिले या अभिनेत्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:35 IST2017-11-02T07:30:14+5:302017-11-02T14:35:16+5:30

अनिल कपूरने आपल्या यशाचे श्रेय बॉलिवूडमधील आपल्या सहअभिनेत्रीला दिले आहे. अनिल कपूरचे असे म्हणणे आहे की, जर पद्मिनी कोल्हापूरेने ...

Anil Kapoor credited his success with the actress | अनिल कपूरने आपल्या यशाचे श्रेय दिले या अभिनेत्रीला

अनिल कपूरने आपल्या यशाचे श्रेय दिले या अभिनेत्रीला

िल कपूरने आपल्या यशाचे श्रेय बॉलिवूडमधील आपल्या सहअभिनेत्रीला दिले आहे. अनिल कपूरचे असे म्हणणे आहे की, जर पद्मिनी कोल्हापूरेने 'वो सात दिन' चित्रपट करण्यास नकार दिला असता तर आज जो काही मी आहे ते कधीच झालो नसतो.

अनिल कपूरने पद्मिनीच्या वाढदिवसाच्या दिवशी १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला 'वो सात दिन' या चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता आणि त्यात त्याने लिहिले  "पद्मिनीला तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी आज जे काही आहे ते पद्मिनी कोल्हापूरेमुळे आहे कारण तिने "वो सात दिन" चित्रपट माझ्याबरोबर करण्यास होकार दिला". 

 बापूद्वारा दिग्दर्शित ‘वो सात दिन’ चित्रपट डॉ. आनंद नावाच्या व्यक्तीच्या भोवती फिरते. ज्याला असे कळते की त्याची नवविवाहित बायको कोणा दुसऱ्यावर प्रेम करते आणि डॉ आनंद त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय करतो  आणि त्या व्यक्तीचा शोधण्यास सुरू करतो.

ALSO READ :  अनिल कपूर आणि सतिश कौशिक फन्ने खानच्या निमित्ताने आले एकत्र

सध्या अनिल कपूर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन बरोबर फन्ने खान मध्ये काम करत आहे . हा एक म्युझिकल कॉमेडी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करतो आहे.  राकेश मेहरा, क्रिअर्ज एंटरटेनमेंट आणि टी सिरिस निर्मित फन्ने खान चित्रपट २००० च्या ऑस्कर नामांकित डच चित्रपट 'एवरीबडीज फेमस' या चित्रपटाचा रिमेक आहे. याआधी दोघे 2000मध्ये आलेल्या हमारा दिल आपके पास है आणि 1999 साली सुपरहिट झालेल्या ताल चित्रपटात दिसले होते. पुढच्या वर्षी 13 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच लवकरच अनिल कपूर  टोटल धमाल या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत दिसण्याची शक्यता आहे. जवळपास 25 वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे. इंदर कुमार या भूमिकेसाठी माधुरीशी बोलतोय. 

Web Title: Anil Kapoor credited his success with the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.