अनिल कपूर आणि सतिश कौशिक फन्ने खानच्या निमित्ताने आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:14 IST2017-10-18T09:44:28+5:302017-10-18T15:14:28+5:30

अनिल कपूर आणि सतिश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. वो सात ...

Anil Kapoor and Satish Kaushik came together on the occasion of Fannie Khan | अनिल कपूर आणि सतिश कौशिक फन्ने खानच्या निमित्ताने आले एकत्र

अनिल कपूर आणि सतिश कौशिक फन्ने खानच्या निमित्ताने आले एकत्र

िल कपूर आणि सतिश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. वो सात दिन, मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची रिअल लाइफ मधील केमिस्ट्री खूपच छान असल्याने पडद्यावरही ती खुलून येते. पण गेल्या अनेक वर्षांत त्यांना एकत्र पाहायला मिळाले नाही. त्यांचे फॅन त्यांना कित्येक दिवसांपासून मिस करत आहेत. त्यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. फन्ने खान या चित्रपटात प्रेक्षकांना आता त्यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. 
फन्ने खान या चित्रपटात अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनिल कपूरसोबत अनेक वर्षांनी काम करायला मिळाले असल्याने सतिश कौशिक खूप खूश आहे. सतिश कौशिकने याबाबत सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. सतिश कौशिकने ट्वीट करून म्हटले आहे की, अनिल कपूर सोबत जवळजवळ मी १५ वर्षांनंतर फन्ने खान या चित्रपटात काम केले. त्याच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच आनंद मला झाला आहे. वो सात दिन पासून ते फन्ने खान पर्यंत आजही आमची केमिस्ट्री तशीच आहे. सतिशच्या या ट्वीटवर अनिलने देखील उत्तर दिले आहे. त्याने ट्वीट करून म्हटले आहे की, अनेक वर्षं निघून गेली आहेत असे वाटतच नाहीये. सतिश कौशिकसोबत काम करण्याचा एक वेगळाच आनंद होतो. आजही तितकीच एनर्जी आमच्या दोघांमध्येही आहे. तसेच आमच्या केमिस्ट्रीतही काहीही फरक झालेला नाहीये. 
सतिशने दिग्दर्शित केलेल्या रूप की राणी चोरो को राजा, बधाई हो बधाई, हमारा दिल आपके पास, हम आपके दिल में रहते है यांसारख्या चित्रपटात देखील अनिलने काम केले आहे. 
फन्ने खानचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर यांनी केले असून राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनिल कपूरसोबतच राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 

Also Read : ‘तेजाब’मध्ये माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती अनिल कपूरची फर्स्ट च्वॉइस!

Web Title: Anil Kapoor and Satish Kaushik came together on the occasion of Fannie Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.