...आणि मीरा शाहिदला म्हणाली,‘क्रॅडल स्रॅचर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 11:41 IST2016-12-03T11:19:25+5:302016-12-03T11:41:47+5:30

‘बी टाऊन’चं सर्वांत हॉट कपलपैकी एक असलेलं जोडपं म्हणजे शाहिद आणि मीरा. त्यांना ‘मीशा’ सारखे कन्यारत्न झाले अन् त्यांचं ...

... and Mira said to Shahid, 'Cradle surgeon'! | ...आणि मीरा शाहिदला म्हणाली,‘क्रॅडल स्रॅचर’!

...आणि मीरा शाहिदला म्हणाली,‘क्रॅडल स्रॅचर’!

ी टाऊन’चं सर्वांत हॉट कपलपैकी एक असलेलं जोडपं म्हणजे शाहिद आणि मीरा. त्यांना ‘मीशा’ सारखे कन्यारत्न झाले अन् त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. मीशाच्या जन्मापर्यंत शाहिदने पालकत्व रजा घेतली होती. तिच्या जन्मानंतरच त्याने चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. नुकतेच हे जोडपं बहुचर्चित टीव्ही शो ‘कॉफी विथ करन’ मध्ये आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान प्रथमच तिने टीव्ही शोवर एन्ट्री केली असं नव्हे तर ती अनेक रॅम्प शोज, पार्टीज मध्ये शाहिदसोबत सहभागी झाली आहे. शोदरम्यान मीराने शाहिदसोबत दिमाखदार एन्ट्री केली. बिनधास्त, बोल्ड, सुंदर असे तिचे व्यक्तीमत्त्व उपस्थित प्रेक्षक आणि पर्यायाने करणच्याही आकर्षणाचे केंद्र ठरले. दरम्यान, त्यांनी करण आणि प्रेक्षकांसोबत छानपैकी गप्पाटप्पा मारल्या.



कार्यक्रमाच्या सुरूवातीला करणने तिला विचारले,‘ तू शाहिदसारख्या  ‘ए’ ग्रेड अभिनेत्यासोबत लग्न करणार असे कळाल्यावर घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती?’ तेव्हा ती म्हणाली,‘ माझ्या आई-वडिलांसाठी ते फार काही फार विशेष नव्हतं. ते अतिशय उच्चशिक्षित आणि फिल्मी वातावरण नसलेले कुटुंब आहे. त्यामुळे आम्ही लग्न करणार हे कोणत्याही आई-वडिलांसाठी मुलीनं लग्न करण्याइतकं ते साधारण होतं.’ त्यावर (हसत) शाहिद म्हणाला,‘ तिच्या घरचे कधीच ‘पेज ३’ हे मनोरंजनजगतातील पान वाचत नाहीत. त्यांना फक्त बिझनेस आधारित पेपर वाचायला आवडतात.’ 



गतवर्षी शाहिद-मीरा यांनी लग्न केलं. तब्बल १३ वर्षांचे त्यांच्या वयातील अंतरामुळे लग्नावेळी चर्चेला उधाण आले. मात्र, ‘मीशा’च्या त्यांच्या आयुष्यात येण्यानं त्यांच्या आयुष्याला एका वळणावर आणून ठेवले आहे. ‘कॉफी विथ करन’ च्या या गप्पाटप्पांच्या सेशनमध्ये पुढे करणने विचारले,‘ मीशा तुमच्या आयुष्याचा एक भाग बनलीय. पण, तिची जास्त काळजी कोणं घेतं? त्यावर मीरा म्हणाली, ‘मी जरी तिला जन्म दिला असला तरीही माझ्यापेक्षा शाहिदचाच तिच्यावर जास्त जीव आहे. त्याच्याच हातात पाळण्याची दोरी (क्रॅडल स्रॅचर) असते. तिला काहीही कमी पडलेलं त्याला चालत नाही. मला अनेकदा त्याचे बोलणेही खावे लागले आहेत.’ त्यावर शाहिदने हसून प्रतिसाद दिला. 

Web Title: ... and Mira said to Shahid, 'Cradle surgeon'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.