-आणि कंगनाला बदलावे लागलेत आडोशाआड कपडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 14:12 IST2016-10-26T14:12:45+5:302016-10-26T14:12:45+5:30
‘बॉलिवूड क्वीन’ कंगना राणौत विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटात झळकणार आहे. पण या चित्रपटासाठी कंगनाला नाही-नाही ते करावे लागले. ...

-आणि कंगनाला बदलावे लागलेत आडोशाआड कपडे!
‘ ॉलिवूड क्वीन’ कंगना राणौत विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटात झळकणार आहे. पण या चित्रपटासाठी कंगनाला नाही-नाही ते करावे लागले. होय, अगदी आडोशामागे कपडे बदल्यापासून तर अनेक गोष्टी. होय,‘रंगून’च्या शूटींगच्यावेळी कंगनाला आपले कपडे दगडांच्या मागे लपत छपकत बदलावे लागले. खुद्द कंगनानेच एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.‘क्वीन’ चित्रपटाच्यावेळी कंगना कॅफेमध्ये कपडे बदलत होती. अरुणाचल प्रदेशमध्ये ‘रंगून’चे शूटींग सुरु असताना कंगनाला अशाच काहीशा परिस्थितीतून जावे लागले होते. पण कंगनाने स्वत:चे ‘स्टार’पण विसरून हे केले. कंगना याबद्दल म्हणाली ,‘वेगवेगळ्या ठिकाणी शूटींग करत असताना अनेकदा तुम्हाला तुमच्या कन्फर्ट झोनच्या बाहेर जावे लागले. आधी या गोष्टींची भीती वाटायची. पण आता सवय झाली आहे. अनेक परिस्थितीत तुमचे स्टारपण कामात येत नाही. तुमच्या प्रोजेक्टवर तुमचे वागणे अवलंबून असते. अरूणाचलच्या एका दुर्गम भागात आम्ही ‘रंगून’चे शूटींग केले. या ठिकाणी काहीच नव्हते, गाव नव्हते की रेस्ट रुम. त्यामुळे दगडाच्या आडोशला मला कपडे बदलावे लागले. नैसर्गिक विधींसाठीही आम्हाला इथेच जावे लागायचे. माझ्याच टीममधील काही लोक मला कव्हर करायचे. शाहीद,सैफ आम्हा सगळ्यांना याच आडोशाआड सगळे उरकावे लागायचे. शेवटी जिथे काहीच नसते तिथे तुम्ही काय करु शकता?’
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’मध्ये कंगनासह शाहीद कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा दुसºया महायुद्धाच्या काळातील आहे.
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’मध्ये कंगनासह शाहीद कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा दुसºया महायुद्धाच्या काळातील आहे.