- आणि ‘आईस कोल्ड वॉटर’मध्ये उतरली सायेशा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 15:25 IST2016-10-22T15:25:37+5:302016-10-22T15:25:37+5:30
माझ्याकडे दुसरा कुठलाही करिअर प्लॅन नाही. त्यामुळे ‘शिवाय’ हिट होणे, माझ्यासाठी खूप गरजेचे आहे, असे सायेशाने प्रामाणिकपणे सांगितलेयं. होय, ...

- आणि ‘आईस कोल्ड वॉटर’मध्ये उतरली सायेशा!
म झ्याकडे दुसरा कुठलाही करिअर प्लॅन नाही. त्यामुळे ‘शिवाय’ हिट होणे, माझ्यासाठी खूप गरजेचे आहे, असे सायेशाने प्रामाणिकपणे सांगितलेयं. होय, आम्ही बोलतोय, ते दिलीप कुमार यांची नात सायेशा हिच्याबद्दल. अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’मधून ती चंदेरी दुनियेत पदार्पण करतेय. हा चित्रपट हिट होणे, सायेशासाठी खूप गरजेचे आहे. कदाचित त्यामुळेच या चित्रपटासाठी तिने अपार मेहनत घेतली. पहिल्या चित्रपटात कुठलीही कसूर राहू नये, यासाठी तिने आटोकाट प्रयत्न केले. अगदी आईस कोल्ड वॉटरमध्ये म्हणजेच गोठवून टाकणाºया पाण्यातील सीन देण्यासाठीही तिने मागेपुढे पाहिले नाही. एकही ब्रेक न घेता तिने हा सगळा सीक्वेंस शूट केला. मनालीच्या हुडहुडी भरवणाºया थंडीत सायेशाला एका गाण्यासाठी बाथटममधला सीन द्यायचा होता. बाथटबमधील पाणी शरीर गोठवणारे होते. पण सायेशाने हे आव्हान स्वीकारले. दोन दिवस हे शूट चालले. पण सायेशाने तक्रारीचा एकही सूर न काढता अगदी परफेक्ट सीन दिला. तिचे काम बघून अजय आणि चित्रपटाची टीम चांगलीच प्रभावित झाली. खुद्द टीममधील एका सदस्यानेच ही माहिती दिली. सायेशावर चित्रीत हे गाणे गत १० आॅक्टोबरला रिलीज झालेय आणि त्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
खरे तर, सायेशा ब्युटी अॅण्ड टॅलेन्टचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, असे अजयम मानतो. ती एक ‘ब्रिलिअंट परफॉर्मर’ आहे, असे अलीकडे एका मुलाखतीत अजय म्हणाला होता. आता तर त्याला सायेशामधील ‘प्रोफेशनॅलिझम’ही भावला आहे. त्यामुळे अजयच्या पुढील चित्रपटात सायेशाची वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. तेव्हा ‘शिवाय’नंतर अजयच्या कुठल्या चित्रपटात सायेशा दिसते, ते बघूच!!