OMG! अनन्या पांडेने चक्क खाल्ला झुरळ? फोटो पाहून चाहतेही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 01:30 PM2021-01-25T13:30:01+5:302021-01-25T13:30:52+5:30

होय, अनन्याचा हा फोटो वेगाने व्हायरल झाला आणि हा फोटो पाहून सगळेच हैराण झालेत.

ananya pandey shared a photo with cockroach in a hand fans wierd react | OMG! अनन्या पांडेने चक्क खाल्ला झुरळ? फोटो पाहून चाहतेही चक्रावले

OMG! अनन्या पांडेने चक्क खाल्ला झुरळ? फोटो पाहून चाहतेही चक्रावले

googlenewsNext
ठळक मुद्देअनन्या पांडे  बॉलिवूड स्टार चंकी पांडेची मुलगी आहे.अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द इयर 2’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे तिचा एक फोटो. होय, अनन्याचा हा फोटो वेगाने व्हायरल झाला आणि हा फोटो पाहून सगळेच हैराण झालेत. या फोटोत अनन्याने हातात झुरळ पकडलाय आणि तो खाण्यासाठी जीभ बाहेर काढलीय.
  झुरळ पाहून अनेक मुली अक्षरश: घाबरतात. पण अनन्या या फोटोत चक्क झुरळ खाण्याच्या तयारी दिसतेय. अनन्याचा हा फोटो पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींच्या मते,अनन्याच्या हातात खरेखुरे झुरळ आहे. तर काहींच्या मते, तिच्या हातातले झुरळ नकली आहे.

अनन्याने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये याचा खुलासा केला. शूटदरम्यान कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारणी हानी पोहोचवली गेली नाही, असे तिने यात स्पष्ट केले आहे. अनन्याचा हा फोटो ‘खाली पीली’ या तिच्या सिनेमाच्या सेटवरचा असल्याचे मानले जात आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदीसोबत शकुन बत्राच्या एका सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले आहे. अर्थात अद्याप नाव गुलदस्त्यात आहे. त्यानंतर ती विजय देवरकोंडा यांच्यासोबत ‘फाइटर’ नावाच्या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अनन्या पांडे  बॉलिवूड स्टार चंकी पांडेची मुलगी आहे.अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द इयर 2’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘पती, पत्नी और वो’ हा तिचा दुसरा सिनेमा होता. यात तिने साकारलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. अनन्या सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते.

Web Title: ananya pandey shared a photo with cockroach in a hand fans wierd react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.