सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणावर अनन्या पांडेने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 19:50 IST2019-04-26T19:50:00+5:302019-04-26T19:50:00+5:30
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणावर अनन्या पांडेने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सर्वांनाच माहित आहे की अनन्याची शाहरूख खानची मुलगी सुहाना खान खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे आता अनन्यानंतर सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. याबाबतचा खुलासा नुकताच अनन्याने एका मुलाखतीत केला आहे.
अनन्याला आधीपासूनच चित्रपटात काम करायचे होते.
तिने सांगितले की,' आधी ती शाहरूख खानचा मुलगा आर्यनची मैत्रीण होती. नंतर सुहानाचा जन्म झाल्यानंतर ती तिची मैत्रिण झाली आणि आता सुहाना खूप खास वाली मैत्रिण आहे.'
सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार असे अनन्या पांडेला विचारल्यावर तिने सांगितले की, 'सुहाना खूप चांगली अॅक्टर आहे. युट्यूबवर तिचे खूप व्हिडिओ आहेत जे तुम्ही पाहू शकता. तिने शेक्सपियरच्या बऱ्याच नाटकात काम केले नाही. ती बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार हे माहित नाही पण केले तर पाहिजे. कारण खरेच ती खूप चांगली अभिनेत्री आहे.'
आता सुहाना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करेल, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
अनन्या पांडेसोबत 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात तारा सुतारिया व टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
करण जोहर निर्मित व पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमा १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.