अनन्या पांडेने शेअर केला लहानपणीचा व्हिडिओ, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, "हिचा अभिनय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:23 PM2023-12-18T16:23:36+5:302023-12-18T16:25:04+5:30

अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या बालपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

ananya panday shared old video netizens troll her saying she is overacting since childhood | अनन्या पांडेने शेअर केला लहानपणीचा व्हिडिओ, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, "हिचा अभिनय..."

अनन्या पांडेने शेअर केला लहानपणीचा व्हिडिओ, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, "हिचा अभिनय..."

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेंने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. लहानपणापासूनच वडील चंकी पांडे यांच्याकडून अभिनयाचे धडे मिळवलेली अनन्या लोकप्रिय स्टारकीड आहे. २०१९ साली 'स्टुडंट ऑफ द इयर २' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली अनन्या अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. आता पुन्हा एकदा अनन्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

अनन्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच अनन्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक अपडेट पोस्टद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. नुकतंच अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या बालपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अनन्या इंग्रजीत कविता म्हणताना दिसत आहे. अनन्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

अनन्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "तेव्हा अभिनय आणि संवादफेक जास्त चांगली होती," अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने "अरे यार हिचा अभिनय लहानपणापासूनच खराब आहे," असं म्हटलं आहे. "ही लहानपासूनच ओव्हर अॅक्टिंग करतेय," अशी कमेंटही केली आहे. अनन्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, अनन्या 'खो गये हम कहा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनन्याने नुकतंच मुंबईत तिचं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती तिने चाहत्यांना दिली होती. 

Web Title: ananya panday shared old video netizens troll her saying she is overacting since childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.