आदित्य रॉय कपूरसोबत रोमाँटिक अंदाजात दिसली अनन्या पांडे, लव्ह बर्डसचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:25 AM2023-10-28T11:25:20+5:302023-10-28T13:10:02+5:30

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे शुक्रवारी रात्री डिनरडेटवर गेले होते.

Ananya panday and aditya roy kapur caught on camera again amid dating rumours | आदित्य रॉय कपूरसोबत रोमाँटिक अंदाजात दिसली अनन्या पांडे, लव्ह बर्डसचा व्हिडीओ होतोय व्हायरल

आदित्य रॉय कपूरसोबत रोमाँटिक अंदाजात दिसली अनन्या पांडे, लव्ह बर्डसचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बी-टाऊनमध्ये अशी अनेक स्टार कपल्स आहेत ज्यांनी अधिकृतपणे त्यांचं नातं कधीच स्वीकारले नाही, पण कायम सार्वजनिक ठिकाणी आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. गेल्या काही दिवसांपासून अशाच एका बॉलिवूड कपलच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. ते म्हणजे आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे. अनन्या आणि आदित्य व्हॅकेशनपासून ते डिनर डेटपर्यंत अनेक ठिकाणी एकत्र दिसतात.  

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे शुक्रवारी रात्री डिनरडेटवर गेले होते. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनन्या पांडे तिचा कथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरचे हात धरून त्याच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे.अनन्याने ज्यापद्धतीने आदित्यच्या खांद्यावर डोके ठेवले आहे त्यावरून दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम अधोरेखित होतेय. तर दुसरीकडे आदित्य कोणाशी तरी बोलताना दिसत आहे.आदित्य आणि अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

 गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आदित्य अनन्या या नव्या लव्हबर्डची जोरदार चर्चा आहे. आदित्य रॉय कपूर अनन्या पांडेपेक्षा एक-दोन वर्षांनी नाही तर १३ वर्षांनी मोठा आहे. आदित्य ३६ वर्षांचा आहे, तर अनन्या फक्त २३ वर्षांची आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनन्या 'खो गये हम कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे, तर आदित्य सारा अली खानसोबत 'मेट्रो इन दिन'मध्ये दिसणार आहे.
 

Web Title: Ananya panday and aditya roy kapur caught on camera again amid dating rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.