/> कोणत्याही कलाकाराला त्याच्या कामाची पावती मिळते ते चाहत्यांच्या प्रेमातून अन पुरस्कारंच्या माध्यमातून. फिल्मि दुनियेत अनेक मोठ-मोठे पुरस्कार सोहळे होत असतात. प्रत्येक कलाकाराला वाटते आपल्यला देखील हा अॅवॉर्ड मिळावा. परंतू म्हणताना काहीही घ्यावे ते नशीबानेच. असेच काही झाले आहे बॉलीवुडमध्ये गेले अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत. अनेक चित्रपटांमध्ये वडिलांच्या, खलनायकाच्या, कॉमेडी अशा विविधांगी भुमिका साकारलेले अनुपम खेर यांची निवड झाली ते डायरेक्ट पद्मविभुषण पुरस्कारासाठी. या पुरस्कारबद्दल अनुपम खुपच भारावलेले असुन ते म्हणतात, मी माझ्या जीवनाचा संपुर्ण प्रवास पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये पाहत आहे. एका छोट्या गावातील मुलाचा तो प्रवास आहे. या आठवणींना उजाळा देत असतानाच अनुपम सांगतात या मेमोरेबल क्षणी पद्म पुरस्कार सोहळ््यामध्ये त्यांची आई त्यांच्या सोबत अ्सणार आहे. त्यांच्या वडिलांना अन पत्नी किरणला या सोहळ््यामध्ये ते मिस करीत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अनुपम खेर यांच्या कारकिर्दीला आणि त्यांना मिळणाºया या पद्म पुरस्कारासाठी त्यांचे अभिनंदन
Web Title: Anamam will see her accepting the Padma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.