अन् माहिरा खान आणि रणबीर कपूरच्या नात्यात आला दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 16:24 IST2018-01-19T10:54:02+5:302018-01-19T16:24:05+5:30
कॅटरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. जग्गा जासूसच्या प्रमोशनच्या वेळी रणबीरचे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा ...
.jpg)
अन् माहिरा खान आणि रणबीर कपूरच्या नात्यात आला दुरावा
क टरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. जग्गा जासूसच्या प्रमोशनच्या वेळी रणबीरचे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत कथित अफेअरची चर्चा झाली होती. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये रणबीर आणि माहिराचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. त्यावेळी दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा देखील झाली होती.
या फोटोंमध्ये रणबीर आणि माहिरा धूम्रपान करताना दिसले होते. या फोटांमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे समजते आहे. डीएनएमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार रणबीर आणि माहिराची मैत्री पहिल्यासारखी आता राहिली नाही. त्याच्या मैत्रीत दुरावा आला आहे.
रणबीर आणि माहिरातचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक अफवा उठल्या होत्या त्यानंतर दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऐवढेच नाही तर रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनी पुढे येऊन आपल्या मुलाचा बचाव केला होता. नंतर रणबीरने एक स्टेटमेंट देऊन या मुद्यांवर आपली बाजू मांडली होती.
माहिराला पाकिस्तानमधून ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ट्रोलर्स माहिराला असे आडव्या हातांना घेत असलेले पाहून रणबीरने या संपूर्ण प्रकरणावर खुलासाही केला होता. मी गेल्या काही काळापासून माहिराला ओळखतो. मी तिचा खूप आदर करतो. त्यामुळे तिला ज्या पद्धतीने जज केले जात आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे, असे रणबीरने एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. पण माहिरा मात्र यावर एक अक्षरही बोलली नव्हती. पण आता माहिरा बोललीय. ‘वरना’ या आपल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रकरणी माहिराने या प्रकरणावर तोंड उघडले.