‘सरकार ३’ मध्ये अमिताभ करणार गणेश आरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 19:16 IST2016-11-09T19:16:59+5:302016-11-09T19:16:59+5:30
राम गोपाल वर्मा यांच्या आगामी ‘सरकार ३’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे शूटिंग ...

‘सरकार ३’ मध्ये अमिताभ करणार गणेश आरती
याबाबतची माहिती स्वत: अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरहून शेअर केली आहे. अमिताभ यांनी गणेशाची आरती करतानाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये समुद्र किनारी अमिताभ गणेशाची आरती करताना दिसत आहेत. या फोटोवर ‘सरकार ३ या चित्रपटासाठी प्रार्थना व गणेशची आरती, ज्याला मी गायले आहे’ अशी कमेंट अमिताभ यांनी केली आहे. यासोबतच आपल्या ब्लॉगवरून ‘सरकार ३ साठी अरबी समुद्राच्या जुहू सागर किनारी आरती के ली’ असेही लिहिलेय.
२००५ साली प्रदर्शित झालेल्या सरकार या चित्रपटानंतर २००८ मध्ये सरकार राज हा सिक्वल तयार करण्यात आला होता. यात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. पुढील वर्षी प्रदर्शित होणाºया सरकारच्या तिसºया भागात अमिताभ बच्चनसह यामी गौतम, मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, रोनित रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात अमिताभ बच्चन सुभाष नागरेची भूमिका करणार असून, मनोज वाजपेयी यांची भूमिका अरविंद केजरीवाल यांच्या चरित्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.