अमिताभ बच्चन यांचा ‘राईटहॅण्ड’ समजल्या जाणाºया ‘या’ अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास तुुम्हाला नि:शब्द करेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 16:24 IST2017-08-01T10:54:47+5:302017-08-01T16:24:47+5:30

लहानपणीचा अमिताभ पडद्यावर साकारण्यासाठी निर्मात्यांची जसे मयूर राज वर्मा या नावाला पसंती होती, तशीच पसंती अमिताभ यांचा साइडकिक म्हणजेच ...

Amitabh Bachchan's 'Written Hand', will be muted by the actor's struggling journey! | अमिताभ बच्चन यांचा ‘राईटहॅण्ड’ समजल्या जाणाºया ‘या’ अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास तुुम्हाला नि:शब्द करेल!

अमिताभ बच्चन यांचा ‘राईटहॅण्ड’ समजल्या जाणाºया ‘या’ अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास तुुम्हाला नि:शब्द करेल!

ानपणीचा अमिताभ पडद्यावर साकारण्यासाठी निर्मात्यांची जसे मयूर राज वर्मा या नावाला पसंती होती, तशीच पसंती अमिताभ यांचा साइडकिक म्हणजेच जीवलग मित्राची भूमिका साकारण्यासाठी एका अभिनेत्याच्या नावाला पसंती होती. होय, या अभिनेत्याचे नाव राम सेठी असे होते. नाव ऐकून कदाचित तुम्हाला तो अभिनेता आठवत नसेल, परंतु त्याचा हसमुख चेहरा बघितल्यानंतर नक्कीच अमिताभ यांच्यासोबतचा त्याचा फिल्मी प्रवास डोळ्यासमोर येईल. राम सेठी यांनी अमिताभसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘याराना’, ‘नमक हलाल’, ‘कालिया’, ‘लावारिस’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये राम सेठी यांनी भूमिका साकारून इंडस्ट्रीत स्थान मिळविले. 



खरं तर राम सेठी यांचे कित्येक काळापासून इंडस्ट्रीमध्ये योगदान होते. परंतु ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला दिशा दिली. या चित्रपटात त्यांनी प्यारेलालची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका एवढी हिट झाली होती की, त्यांना राम सेठी नव्हे तर प्यारेलाल या नावानेच पुढे ओळखले जाऊ लागले. शिवाय या भूमिकेमुळे त्यांना एका पाठोपाठ एक अशा भूमिका मिळत गेल्या. त्यामुळे दिवसागणिक त्यांचे स्टारडम वाढत गेले. प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’नंतर अमिताभ आणि राम सेठी यांची जोडी अशी काही हिट झाली की, निर्मात्यांची ही जोडी पहिली पसंती असायची. 



अभिनयाबरोबरच राम सेठी यांनी दिग्दर्शनातील बारकावेही अवगत केले होते. ते प्रकाश मेहरा यांच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून काम करू लागले. त्यांनी स्मिता पाटील आणि शशी कपूर यांच्यासोबत ‘घुंघरू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. खरं तर या चित्रपटासाठी राम सेठी त्यांचा जीवलग मित्र अमिताभ यांना संधी देऊ इच्छित होते. मात्र ‘कुली’दरम्यान अमिताभ यांना अपघात झाल्याने अमिताभ या चित्रपटामध्ये काम करू शकले नव्हते. राम सेठी त्यांच्या करिअरमध्ये खूपच आनंदी होते. परंतु मधल्या काळात त्यांना असा काही ब्रेक बसला की, त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यावेळी राम सेठी यांचे वय ५३ वर्ष इतके होते. त्यांच्यावर परिवाराची जबाबदारी होती. अशात काम मिळत नसल्याने ते खूपच हतबल झाले होते. एक काळ तर असा होता की, दोन वेळच्या जेवणाचीही त्यांची परिस्थिती नव्हती. 



याबाबतचा उल्लेख राम सेठी यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता. यावेळी त्यांनी असे म्हटले होते की, आर्थिक तंगीमुळे त्यांना फूटपाथवर राहण्याची वेळ आली होती. अशात दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी त्यांना मदत केली. मात्र म्हणतात की, वेळ बदलत असते. तसेच काहीसे राम सेठी यांच्याबाबत घडले. काही काळानंतर राम सेठी यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद परतला. १९९४ मध्ये काही टीव्ही निर्माते राम सेठी यांनी अ‍ॅप्रोच झाले. त्यांच्यासोबत त्यांनी काही शोदेखील केले. मात्र राम सेठी यांच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण क्षणभंगूर ठरले. परिवारात घडलेल्या एका घटनेमुळे त्यांना अभिनयापासून दूर जावे लागले. जेव्हा ते दोन वर्षांनंतर मुंबईत परतले तेव्हा सगळे काही बदलले होते. नव्या वातावरणात राम सेठी यांना अ‍ॅडजस्ट करणे अवघड जात होते. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले. 



पुढे त्यांची परिस्थिती अशी झाली होती की, जेव्हा ते त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी जात असत, तेव्हा त्यांचे नावदेखील त्यांना आठवत नसे. यावेळेही प्रकाश मेहरा यांनीच त्यांना मदतीचा हात दिला. त्यावेळी राम सेठी यांना परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी जमीन विकावी लागली. मात्र राम सेठी यांची अशाही परिस्थितीत जिद्द खचली नव्हती. वयाच्या ७३व्या वर्षी पुन्हा एकदा त्यांनी भरारी घेण्याचे ठरविले. आज ते स्क्रीनप्ले रायटर, डायरेक्टर फिल्ममेकिंगसाठी सल्लागार म्हणून काम करीत आहेत. राम सेठी यांचा हा संघर्षमय प्रवास खरोखरच प्रेरणादायी म्हणावा लागेल. 

Web Title: Amitabh Bachchan's 'Written Hand', will be muted by the actor's struggling journey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.