‘७५ फ्रेम्स’मधून दिसली महानायक अमिताभ बच्चन यांच्या यशस्वी कारकिर्दीची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 21:59 IST2018-06-03T16:29:32+5:302018-06-03T21:59:32+5:30

अ‍ॅँग्री यंग मॅन म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झाला अन् बघता बघता सारे विश्वच आपलेसे केले. नायकाच्या परंपरेला साजेशी शरीरयष्टी नसतानाही ...

Amitabh Bachchan's successful career seen from '75 Frames'! | ‘७५ फ्रेम्स’मधून दिसली महानायक अमिताभ बच्चन यांच्या यशस्वी कारकिर्दीची झलक!

‘७५ फ्रेम्स’मधून दिसली महानायक अमिताभ बच्चन यांच्या यशस्वी कारकिर्दीची झलक!

ॅँग्री यंग मॅन म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झाला अन् बघता बघता सारे विश्वच आपलेसे केले. नायकाच्या परंपरेला साजेशी शरीरयष्टी नसतानाही तब्बल ४० वर्ष इंडस्ट्रीत आपला रूतबा कायम ठेवणाºया महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रवास म्हणावा तितका नक्कीच सोपा नव्हता. त्यांच्या या प्रवासाची झलक ‘७५ फ्रेम्स’ या प्रदर्शनात बघावयास मिळाली. अमिताभ यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.  

येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनात बिग बींच्या सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाची झलक बघावयास मिळते. प्रदर्शनात १९७२ ते ८२ च्या दशकातील अमिताभ बघितल्यानंतर त्या काळातील ‘अदालत, खून-पसीना, डॉन, कस्मे वादे, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, काला पत्थर, कालिया आणि लावारिस’ या चित्रपटांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. १९८४ साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा इंदिराजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मित्र राजीव गांधी यांच्या दु:खात अमिताभ हेदेखील शोकमग्न झाल्याचे प्रदर्शनात बघावयास मिळते. 



पत्नी जया बच्चन आणि मुले अभिषेक आणि श्वेता नंदासोबतची त्यांची केमिस्ट्री दर्शविणारी छायाचित्रेही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. त्यांचा ‘सरकार’ असो वा अलीकडच्या काळातील ‘लूक’ अशा सर्वच छटा या प्रदर्शनात दिसून येतात. एकूणच प्रदर्शनात मांडण्यात आलेले त्यांची छायाचित्रे बघून उपस्थित अमिताभ यांच्या थक्क करणाºया प्रवासामध्ये रमल्याचे दिसून आले. 



दरम्यान, या प्रदर्शनात अमिताभ यांची छायाचित्रे, पेटिंग्स, स्केचेस, आर्ट वर्क्स, पोस्टर्स आदी मांडण्यात आले आहेत. प्रदीप चंद्रा आणि एसएमएम औजा यांची ती निर्मिती आहे. प्रदर्शनाला पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, रतन लथ, शर्वरी लथ, अतुल चांडक, शैलेश कुटे यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांनी भेट दिली. 



कॉँग्रेसचे उमेदवार अमिताभ...
अलाहाबाद मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविणाºया अमिताभ यांचे त्यावेळेचे प्रचाराचे एक पोस्टरही प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. ‘राजीव गांधी यांचे हात मजबूत करा, अमिताभ बच्चन यांना प्रचंड मतांनी निवडून द्या’ असा आशय असलेले हे पोस्टर्स प्रदर्शनात कुतुहलाचा विषय होता.

Web Title: Amitabh Bachchan's successful career seen from '75 Frames'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.