अमिताभ बच्चन यांच्या 'या' खास गोष्टीमुळे रेखा व्हायच्या आकर्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:23 IST2017-09-11T06:53:59+5:302017-09-11T12:23:59+5:30

बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखाची लव्ह स्टोरी जग जाहीर आहे. आज ही यांची प्रेमकहानी अनेकांच्या ओठ्यांवर आहे. यांच्या ...

Amitabh Bachchan's 'Distinguished Things' Due to Being Drawing | अमिताभ बच्चन यांच्या 'या' खास गोष्टीमुळे रेखा व्हायच्या आकर्षित

अमिताभ बच्चन यांच्या 'या' खास गोष्टीमुळे रेखा व्हायच्या आकर्षित

ग बी अमिताभ बच्चन आणि रेखाची लव्ह स्टोरी जग जाहीर आहे. आज ही यांची प्रेमकहानी अनेकांच्या ओठ्यांवर आहे. यांच्या लव्ह स्टोरीमुळे अनेक विवाद ही झाले होते. अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्यासोबत एक आनंदी आयुष्य जगच आहेत तर रेखा आजही साथीदाराच्या शोधात आहे. रेखा आजही अमिताभ बच्चन यांना विसरु शकली नाही. आजही संधी मिळातच त्या बिग बींची स्तुती करायला विसरत नाहीत. नुकत्याच एक इंटरव्ह्यु दरम्यान रेखा यांनी बिग बींच्या मनाच्या मोठेपणाचे आणि नात्यांना घेऊन त्यांची असलेली गंभीरता मला त्यांच्याकडे आकर्षित करायचा. रेखा पुढे म्हणाल्या होत्या की ''मोठा माणूस तोच असतो जो स्वत:साठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगतो आणि अमिताभ यांपैकी एक आहेत. अमिताभ किती ही दु:खात असेल तरी ते नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.''

ALSO READ : कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या एका भागासाठी अमिताभ बच्चन घेतात तब्बल इतके पैसे

याच कारणामुळे अमिताभ यांनी कधी ही दुसरा विवाह केला नाही कारण त्यांना कधीच आपल्यामुळे इतरांना दुखवायचे नव्हते. ज्यावेळी रेखाशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन बिग बी आपल्या वडिलांकडे गेले होते त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना हेच समजावले होतो तुझ्या एका निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होईल. बिग बी आपल्या वडिलांचे नेहमीच ऐकायचे त्यानंतर त्यांनी रेखा यांच्यासोबत असलेले नातं सपवण्याचा निर्णय घेतला. आजही अनेकवेळा जेव्हा बॉलिवूडमधल्या नात्यांबाबत चर्चा होते तेव्हा सगळ्यात आधी बिग बी आणि रेखा यांचे नाव सगळ्यात आधी येते. सध्या अमिताभ हे छोट्या पडद्यावर 'कौन बनेंगा करोडपती'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ते 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये आमीर खानच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. 

Web Title: Amitabh Bachchan's 'Distinguished Things' Due to Being Drawing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.