...तर ही आहे अमिताभ बच्चनची डेली रुटीन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 16:49 IST2017-07-06T11:19:26+5:302017-07-06T16:49:57+5:30
-Ravindra More बॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांची. ...
.jpg)
...तर ही आहे अमिताभ बच्चनची डेली रुटीन !
बॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांची. आज आपण त्यांचे डेली रुटीन काय आहे याबाबत जाणून घेऊया.
* सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ रोज सकाळी साडे पाच वाजता उठतात. विशेष म्हणजे ते उठण्याच्या बाबतीत खूपच शिस्तबद्ध आहेत. दिवसभर काम करुन रात्री उशिरा झोपले तरीही ते सकाळी पहाटे लवकरच उठतात.
* पहाटे लवकर उठल्यानंतर सात वाजेपर्यंत फ्रेश होतात आणि त्यानंतर लगेच जिमला जातात. शिवाय योगा आणि सायकलिंगदेखील करतात. वर्कआउट झाल्यानंतर बिग बी सात्विक ब्रेकफास्ट घेतात. त्यानंतर ९.३० वाजता काम करण्यास सुरुवात करतात.
* अमिताभ बच्चन यांचा देवावर खूपच विश्वास आहे. त्यांनी आपल्या 'जलसा' बंगल्यात छोटेसे मंदिर बांधले आहे. घरातून बाहेर निघण्यापूर्वी बिग बी देवाचे दर्शन घेण्यास विसरत नाहीत. त्यांच्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि गणपती या देवांच्या मुर्ती आहेत. याशिवाय घरात गणपती बप्पाच्या अनेक मुर्ती स्थापित आहेत.
* बिग बी केवळ शुद्ध शाकाहारी जेवण घेतात. विशेष म्हणजे खूपच साधे आयुष्य जगण्यावर भर देतात. मद्यपान आणि धुम्रपानाला त्यांच्या आयुष्यात कुठेच जागा नाही.
* बिग बी यांना ड्रायव्हिंग करायला खूप आवडते. त्यांना कार चालवायला मोठा शौक आहे. तो आनंद मिळण्यासाठी ते रात्री ड्राइव्हला जातात. 74 व्या वर्षीदेखील मुंबईसारख्या ट्राफिकने भरलेल्या शहरात ते कार ड्राइव्ह करतात.
* 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो असो अथवा पब्लिक अॅपीयरन्स बिग बी फॉर्मल कपड्यांमध्ये दिसतात. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'जेव्हा ते घरी असतात, तेव्हा कुर्ता पायजमा, पठाणी आणि ट्रॅक सूट परिधान करतात.'
* बच्चन अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करतात. त्यात काही मोबाईल कंपन्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांना अनेक फोन कॉम्पिलीमेंट्री गिफ्ट्स म्हणून मिळत असतात. सध्या बिग बी एका विशिष्ट कंपनीचा फोन वापरत आहेत. या फोनची ते जाहिरातही करतात. शिवाय ते तीन आणखी मोबाईल वापरतात. म्हणजेच बिग बी एकाच वेळी चार मोबाईल वापरतात, हे विशेष.
Also Read : Anniversary : वडिलांची ‘ही’ अट पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चन अन् जयानी केला विवाह!