अमिताभ बच्चन यांच्या भावाने कार चोरी गेल्याची दिली तक्रार; तपासात आढळली धक्कादायक बाब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 18:35 IST2017-12-22T13:05:38+5:302017-12-22T18:35:38+5:30
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांच्यासाठी बुधवारचा दिवस चांगलाच डोकेदुखीचा ठरला. त्याचे झाले असे की, एका हॉटेलच्या ...

अमिताभ बच्चन यांच्या भावाने कार चोरी गेल्याची दिली तक्रार; तपासात आढळली धक्कादायक बाब!
म गास्टार अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांच्यासाठी बुधवारचा दिवस चांगलाच डोकेदुखीचा ठरला. त्याचे झाले असे की, एका हॉटेलच्या अपोझिट जुहू तारा रोडवर त्यांनी त्यांची सेडन कार पार्क केली होती. परंतु ही कार तेथून गायब झाल्याने त्यांची चांगलीच डोकेदुखी झाली. त्यांनी थेट सांताक्रुज येथील पोलीस ठाणे गाठत याबाबतची रितसर तक्रार नोंदविली. पोलिसांनीही तत्परता दाखवित लगेचच कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांच्या या तपासात एक आश्चर्यचकीत करणारी बाब समोर आली. होय, अजिताभ यांची ही कार बेकायदेशीररीत्या रस्त्यावर पार्क केल्याने वाहतूक पोलिसांनी ती उचलून नेली होती.
पोलीस सूत्रांनी टाइम्स आॅफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार ७० वर्षीय अजिताभ यांची कार दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान वाहतूक पोलिसांनी उचलून नेली होती. त्यावेळी ते काहीतरी कामासाठी हॉटेल अजंता येथे गेले होते. जेव्हा ते तीन वाजेच्या दरम्यान हॉटेलबाहेर आले तेव्हा कार गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच आॅटोमध्ये सांताक्रुज पोलीस ठाणे गाठत ३.१५ वाजेच्या दरम्यान तक्रार दाखल केली. सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘अजिताभ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रस्त्याच्या दुसºया बाजूने कार पार्क केली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका टीमला विविध भागांमध्ये रवाना करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही बघितले. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की, कार ट्रॅफिक पोलिसांनी उचलून नेली.
![]()
कारची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची टीम त्यांना सांताक्रुज (पश्चिम) येथील वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेले. ज्याठिकाणी त्यांना नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केल्याबद्दल दोनशे रूपयांचा दंड भरावा लागला. याव्यतिरिक्त त्यांना कारला टोइंग करून नेण्यासाठी लागणारा खर्चही भरावा लागला. दरम्यान, याप्रकरणी जेव्हा अजिताभ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.