32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...! अमिताभ यांनी शेअर केली कविता, कवीने मागितले 32 रूपये!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 11:24 IST2019-06-24T11:23:57+5:302019-06-24T11:24:46+5:30
नुकतीच अमिताभ यांनी एक कविता शेअर केली. पण हे काय? अमिताभ यांनी शेअर केलेली ही कविता आपली आहे, असा दावा एका कवीने केला. केवळ इतकेच नाही तर यापोटी अमिताभ यांच्याकडे ३२ रूपयांची मागणी केली.

32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...! अमिताभ यांनी शेअर केली कविता, कवीने मागितले 32 रूपये!!
महानायक अमिताभ बच्चन या वयातही प्रचंड बिझी आहे. एकापाठोपाठ एक सिनेमे, शूटींग, प्रवास असा सगळा व्याप असूनही अमिताभ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात. स्वत:चे जुने फोटो, कविता, विनोद असे सगळे ते सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच अमिताभ यांनी एक कविता शेअर केली. पण हे काय? अमिताभ यांनी शेअर केलेली ही कविता आपली आहे, असा दावा एका कवीने केला. केवळ इतकेच नाही तर यापोटी अमिताभ यांच्याकडे ३२ रूपयांच्या मोबदल्याची मागणी केली.
अमिताभ यांनी ट्विटरवर हिंदी भाषेवर कविता पोस्ट केली.
T 3202 - हिन्दी नायाब है
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 22, 2019
छू लो तो-चरण
अड़ा दो तो-टांग
धँस जाए तो-पैर
आगे बढ़ाना हो तो-क़दम
राह में चिह्न छोड़े तो-पद
प्रभु के हों तो-पाद
बाप की हो तो-लात
गधे की पड़े तो-दुलत्ती
घुंघरू बाँध दो तो-पग
खाने के लिए-टंगड़ी
खेलने के लिए-लंगड़ी
अंग्रेजी में सिर्फ़-LEG
प्रणाम Ef~Ns
हिन्दी नायाब है
छू लो तो-चरण
अड़ा दो तो-टांग
धँस जाए तो-पैर
आगे बढ़ाना हो तो-कदम
राह में चिह्न छोड़े तो-पद
प्रभु के हों तो-पाद
बाप की हो तो-लात
गधे की पड़े तो-दुलत्ती
घुंघरू बाँध दो तो-पग
खाने के लिए-टंगड़ी
खेलने के लिए-लंगड़ी
अंग्रेजी में सिर्फ़-LEG
प्रणाम Ef~Ns
32 रुपए तो अपने भी बनते हैं गुरु! 😛😛😛😜😜😜@SrBachchan@DrKumarVishwaspic.twitter.com/yBwKYKXPRl
— Prabudha Saurabh (@Prabudhaspeaks) June 23, 2019
अमिताभ यांनी ही कविता पोस्ट करताच, कवी प्रबुद्ध सौरभ यांनी स्क्रीनशॉट शेअर करत ही कविता त्यांची असल्याचा दावा केला. शिवाय काहीशा मजेशीर अंदाजात, ‘32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...’ असे लिहिले. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी बिग बींसोबत कुमार विश्वास यांनाही टॅग केले.
कुमार विश्वास यांना टॅग करायचे कारण म्हणजे, 2017 मध्ये कुमार विश्वास यांनी अमिताभ यांचे पिताश्री हरिवंश राय बच्चन यांची एक कविता गायली होती. तसेच त्याचा व्हिडीओ यु-ट्यूबवर अपलोड केला होता. कुमार विश्वास यांनी ही कविता शेअर करताना हरिवंश राय बच्चन यांना क्रेडिटही दिले होते. मात्र याऊपर आपल्या पित्याच्या कवितेचा वापर करून कुमार विश्वास यांनी कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा अमिताभ यांनी केला होता. शिवाय कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठववलीहोती. कुमार विश्वास यांनी यासाठी माफी मागवी, संबंधित पोस्ट त्वरित डिलीट करावी आणि यातून कमावलेला पैसा परत करावा,अशी मागणी अमिताभ यांनी केली होती. यानंतर कुमार विश्वास यांनी अमिताभ यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली होती. ‘सर्वांकडून माझी प्रशंसा झाली. पण तुमच्याकडून मला कायदेशीर नोटीस मिळाले. बाबूजींचा श्रद्धांजली व्हिडीओ डिलीट करतोय आणि सोबतच तुम्ही मागितल्यानुसार, यातून कमावलेले 32 रूपये परत करतोय,’ असे कुमार यांनी लिहिले होते. अर्थात आता हा वाद निवळला आहे.