हा अभिनेता आहे अमिताभ बच्चन यांचा सगळ्यात जवळचा मित्र, त्यांनीच दिली ही माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 15:42 IST2019-04-08T15:41:23+5:302019-04-08T15:42:54+5:30
अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आता एका तामीळ चित्रपटात प्रेक्षकांना त्यांना पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे नाव उयरंथा मनिथम असे आहे

हा अभिनेता आहे अमिताभ बच्चन यांचा सगळ्यात जवळचा मित्र, त्यांनीच दिली ही माहिती
अमिताभ बच्चन यांना चांगलेच फॅन फलॉव्हिंग आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे त्यांना बॉलिवूडचा शहेशशहा म्हटले जाते. त्यामुळे या शहेनशहाच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा नेहमीच त्यांच्या फॅन्सना लागलेली असते. त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय काय सुरू आहे, त्यांचा सगळ्याच जवळचा मित्र कोण आहे याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना नेहमीच लागलेली असते. अमिताभ बच्चन यांनीच नुकतीच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना सांगितलेली आहे.
T 3141 - Two disciples under the shadow of the MASTER - Shivaji Ganesan ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 3, 2019
Surya and self !
Shivaji the Ultimate Iconic Legend of Tamil Cinema .. his picture adorns the wall .. my respect and admiration ,👣 i touch his feet !
அவர் மாஸ்டர் .. நாம் அவருடைய சீடர்கள் pic.twitter.com/u4dGGQE1Bd
अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आता एका तामीळ चित्रपटात प्रेक्षकांना त्यांना पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे नाव उयरंथा मनिथम असे आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला त्यांनी सुरुवात केली असून याच चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटद्वारे त्यांनी त्यांचा सगळ्यात चांगला मित्र कोण आहे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे.
अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या या फोटोत आपल्याला त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला देखील पाहायला मिळत आहे. या फोटोत एकावर एक ठेवलेल्या चार खुर्च्यांवर ते दोघे बसलेले दिसत आहेत. या फोटोसोबतच अभिषेक त्यांचा खूपच चांगला मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जेव्हा तुमचा मुलगा केवळ तुमचे शूजच घालत नाही तर केवळ तुमच्या इतक्याच खुर्च्यांवर बसतो, त्यावेळी तो केवळ तुमचा मुलगा राहात नाही तर तो तुमचा जवळचा मित्र देखील होतो.
अमिताभ बच्चन उयरंथा मनिथम या चित्रपटाद्वारे तमीळ चित्रपटसृष्टीत एंट्री करत असून या चित्रपटाची निर्मिती एसजी सुरयाँ यांनी केली आहे तर या चित्रपटाचे लेखन जवार सीथारामण यांनी केले असून या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश्नन-पंजू यांनी केले आहे. या चित्रपटात अमिताभ यांची जोडी राम्या क्रिश्नन यांच्यासोबत जमली असून राम्याला बाहुबली या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.