युजर्सच्या कमेंट्सवर अमिताभ बच्चन यांचा चढला पारा, भडकून म्हणाले- क्या कर लोगे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:17 IST2022-04-07T13:40:54+5:302022-04-07T15:17:51+5:30
Amitabh Bachchan : काही दिवस अमिताभ शांत बसले. पण अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. यावेळी त्यांनी कडक शब्दात ट्रोलर्सवर पलटवार केला.

युजर्सच्या कमेंट्सवर अमिताभ बच्चन यांचा चढला पारा, भडकून म्हणाले- क्या कर लोगे?
अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) ‘दसवीं’ (Dasvi) हा सिनेमा आज 7 एप्रिलला ओटीटीवर रिलीज झालाये. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. केवळ अभिषेकचं नाही तर त्याचे ‘पा’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही लेकाच्या सिनेमाचं धडाक्यात प्रमोशन चालवलं होतं. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर त्यांनी अभिषेकच्या या चित्रपटाचं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रमोशन केलं. पण काहींना ते रूचलं नसावं. मग काय, ट्रोलर्सनी यावरून अमिताभ यांना लक्ष्य करायला सुरूवात केली. काही दिवस अमिताभ शांत बसले. पण अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटलाच. यावेळी त्यांनी कडक शब्दात ट्रोलर्सवर पलटवार केला.
मध्यरात्री ट्रोलर्सला सुनावणारं एक ट्विट त्यांनी शेअर केलं. ‘जी हाँ हुजूर, मैं करता हूँ : बधाई, प्रचार, मंगलाचार !!! क्या कर लोगे ??,’ अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.
T 4243 - जी हाँ हुज़ूर, मैं करता हूँ : बधाई, प्रचार, मंगलाचार !!!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 6, 2022
क्या कर लोगे ~ ??
या ट्विटमधून बिग बींनी ट्रोलर्सला खरपूस उत्तर दिलं खरं. पण याऊपरही अनेकांनी त्यांना ट्रोल करणं सुरूच ठेवलं. बिग बींच्या या ट्विटवरूनही अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या महिन्यात अमिताभ यांनी अभिषेकचं कौतूक करणारी एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी अभिषेकचं ‘दसवी’ सिनेमातील कामाविषयी कौतूक करताना तो आपला सर्वच बाबतीत उत्तराधिकारी बनण्यास पात्र आहे असं म्हटलं होतं. त्यावेळी अमिताभ यांनी आपले वडील हरिवंशराय बच्चन यांची एक कविता देखील पोस्ट केली होती.
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 7, 2022
अभिषेक बच्चनचा नेटफ्लिक्स आणि जिओवर रिलीज झालेल्या ‘दसवी’ या सिनेमात अभिषेकनं अशिक्षित गंगाराम चौधरी या भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात त्याला अटक होते आणि तुरुंगात त्याला एक वेगळं चॅलेंज मिळतं. हे चॅलेंज म्हणजे शिक्षण. शिक्षण घेऊन काय चमत्कार घडवतो, हे तो दाखवतो. सिनेमात अभिषेक बच्चननसोबत यामी गौतम,निमरत कौर या देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.