केवळ अभिषेक बच्चनच नाहीये अमिताभ यांच्या संपत्तीचा वारस, या व्यक्तीला देखील मिळणार संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:14 IST2020-03-02T16:03:42+5:302020-03-02T16:14:04+5:30

अमिताभ यांच्यानंतर त्यांची संपत्ती ते कोणाला देणार आहेत याविषयी त्यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते.

Amitabh Bachchan Decides To Divide His Property, Equally Between Abhishek And Shweta PSC | केवळ अभिषेक बच्चनच नाहीये अमिताभ यांच्या संपत्तीचा वारस, या व्यक्तीला देखील मिळणार संपत्ती

केवळ अभिषेक बच्चनच नाहीये अमिताभ यांच्या संपत्तीचा वारस, या व्यक्तीला देखील मिळणार संपत्ती

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनी लिहिले होते की, माझ्या मृत्यूनंतर माझी जी काही संपत्ती असेल ती, माझी मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांच्यात समान वाटण्यात येईल.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

सात हिंदुस्तानी हा अमिताभ यांचा पहिला चित्रपट 7 नोव्हेंबर 1969 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आता 50 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या चित्रपटासाठी अमिताभ यांना केवळ 5000 इतके मानधन मिळाले होते. या चित्रपटानंतर त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले. आज अमिताभ यांच्याकडे 2800 कोटींहून अधिक संपत्ती आहे. 

अमिताभ यांच्यानंतर त्यांची संपत्ती ते कोणाला देणार आहेत याविषयी  त्यांनी ट्वीट करून काही वर्षांपूर्वी सांगितले होते. स्त्री-पुरुष समानतेवर अमिताभ यांनी काही वर्षांपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘माझ्या मृत्यूनंतर माझी जी काही संपत्ती असेल ती, माझी मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांच्यात समान वाटण्यात येईल. सोबतच त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. आपल्या या ट्वीटद्वारे अमिताभ यांनी लिंग समानतेचे एक आदर्श उदाहरण घालून दिले होते.

अमिताभ बच्चन यांनी काही महिन्यांपूर्वी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात देखील पुन्हा एकदा याविषयी सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘मी नसेल तेव्हा माझ्याकडे जे काही आहे, ते माझ्या दोन मुलांचे असेल. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझ्या मृत्यूपश्चात माझी संपत्ती या दोघांत समान प्रमाणात वाटली जाईल,’ असे अमिताभ यावेळी म्हणाले होते. एकंदर काय तर अमिताभ त्यांची संपत्ती केवळ अभिषेकला एकट्याला देणार नसून त्यात श्वेता बच्चनचाही समान वाटा असेल.

Web Title: Amitabh Bachchan Decides To Divide His Property, Equally Between Abhishek And Shweta PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.