श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अमिताभ बच्चन यांनी रद्द केली चित्रपटाची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 09:51 AM2018-02-26T09:51:17+5:302018-02-26T15:23:43+5:30

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच अमिताभ यांनी आगामी चित्रपट '102 नॉट आउट'चे शूटिंग रद्द केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी ...

Amitabh Bachchan canceled film as soon as he heard about Sridevi's death | श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अमिताभ बच्चन यांनी रद्द केली चित्रपटाची शूटिंग

श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अमिताभ बच्चन यांनी रद्द केली चित्रपटाची शूटिंग

googlenewsNext
रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच अमिताभ यांनी आगामी चित्रपट '102 नॉट आउट'चे शूटिंग रद्द केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 25 फेब्रुवारीला या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार होते. मात्र ते पोस्टपोन करण्यात आले आहे.  

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी सांगितले की रविवारी या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्याकडून संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे शूटिंग करण्यात येणार होते. इंडो एशियनशी बोलताना ते म्हणाले, ''श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या आठवणीत आणि त्यांच्याबाबतचा आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही चित्रपटातील गाण्याचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. देव त्यांच्या आत्माला शांती देवो.''      

श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त येण्याच्या काही वेळा पूर्वी अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते की, ''माहिती नाही का पण एक वेगळीच भीती वाटते आहे.'' 

श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.
 
श्रीदेवी यांनी १९७८ ला सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्याचबरोबर, श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

Web Title: Amitabh Bachchan canceled film as soon as he heard about Sridevi's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.