​अमिताभ बच्चन फेसबुकवर नाराज; ट्विटरवरून नोंदवली तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 11:29 IST2017-06-26T05:56:55+5:302017-06-26T11:29:16+5:30

महानायक अमिताभ बच्चन सध्या नाराज आहे. होय, कशावर तर फेसबुकवर. अमिताभ यांनी फेसबुकबद्दलची नाराजी ट्विटरवर बोलून दाखवली आहे. फेसबुक ...

Amitabh Bachchan angry on Facebook; Reported from Twitter! | ​अमिताभ बच्चन फेसबुकवर नाराज; ट्विटरवरून नोंदवली तक्रार!

​अमिताभ बच्चन फेसबुकवर नाराज; ट्विटरवरून नोंदवली तक्रार!

ानायक अमिताभ बच्चन सध्या नाराज आहे. होय, कशावर तर फेसबुकवर. अमिताभ यांनी फेसबुकबद्दलची नाराजी ट्विटरवर बोलून दाखवली आहे. फेसबुक अकाऊंटच्या सर्व फीचर्सचा वापर करू शकत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी फेसबुककडे याबाबत तक्रार नोंदवली आहे. ‘हॅलो फेसबुक ! जागो! माझे फेसबुक पेज पूर्णपणे उघडत नाहीय. कित्येकदिवसापासूनची ही तक्रार आहे. अखेर मला याची तक्रार करण्यासाठी अन्य एका माध्यमाची मदत घ्यावी लागली,’ असे अमिताभ यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ही तक्रार करताना अमिताभ यांनी स्वत:चा अँग्री यंग मॅन लूकमधील एका फोटोचा वापर केला.  आता अमिताभ यांच्या या तक्रारीची फेसबुक कशी दखल घेतो, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.अमिताभ यांचे  फेसबुक व ट्विटरवर २.७० कोटी फॉलोअर्स आहेत. अमिताभ या दोन्ही सोशल नेटवर्कींग साईटवर कमालीचे अ‍ॅक्टिव्ह असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक घडामोडी ते यामाध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असतात. एवढेच नाही तर ते ब्लॉगही लिहिलात. गेल्या अनेक वर्षांपासून ते ब्लॉग लिहित आहेत. सध्या अमिताभ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहेत.
काही दिवसांपूर्वी अमिताभ सोनम कपूरवर असेच नाराज झाले होते. अर्थात ही नाराजी प्रेमळ होती. सोनमच्या वाढदिसाला अमिताभ यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मॅसेज केला होता. पण सोनमने सगळ्यांच्या मॅसेजचे उत्तर दिले. पण अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या मॅसेजला मात्र उत्तर दिले नाही. अमिताभ यांनी मग सोनमला चांगलेच रागावले. अर्थात लाडाने!  ‘प्रिय सोनम, मी अमिताभ बच्चन. वाढदिवसाच्या निमित्ताने तुला एक मेसेज केला होता. पण, तू काही त्याचे उत्तर दिले नाहीस’,असे ट्विट अमिताभ यांनी यानंतर केले होते. विशेष म्हणजे,  या ट्विटमध्ये रागीट चेहºयाचा एक इमोजीही त्यांनी वापरला होता.  अमिताभ यांच्या या ट्विटनंतर सोनमला लगेच आपली चूक उमगली होती. ‘अरे देवा! सर मला खरंच तुमचा मेसेज नाही मिळाला. मी नेहमीच तुम्हाला रिप्लाय देते. पण, तरीही खूप खूप धन्यावाद सर. मला अभिषेकचा मेसेज मिळाला, मी खरंच मनापासून तुमची माफी मागते’, असे ती म्हणाली होती.

Web Title: Amitabh Bachchan angry on Facebook; Reported from Twitter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.