अमिताभ बच्चन आणि अमृता फडणवीस यांचे नवे गाणे 'लाँच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 14:39 IST2017-06-01T09:09:36+5:302017-06-01T14:39:36+5:30

अमृता फडणवीस यांनी यापूर्वी कुणाल कोहलींच्या ‘फिर से’ तर प्रकाश झा च्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटांसाठी ही गाणी गायली ...

Amitabh Bachchan and Amrita Fadnavis' new song 'Launch' | अमिताभ बच्चन आणि अमृता फडणवीस यांचे नवे गाणे 'लाँच'

अमिताभ बच्चन आणि अमृता फडणवीस यांचे नवे गाणे 'लाँच'

ृता फडणवीस यांनी यापूर्वी कुणाल कोहलींच्या ‘फिर से’ तर प्रकाश झा च्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटांसाठी ही गाणी गायली आहेत. प्लेबॅक सिंगिगनंतर आता ‘फिर से’ या गाण्यासह त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. ‘फिर से’ गाण्याचा  व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला. अमिताभ बच्चन आणि अमृता फडणवीस यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.  या गाण्याविषयी बोलताना त्या म्हणतात, “गाण्याचं नाव जरी फिर से असलं तरी बऱ्याचशा गोष्टी या गाण्यात माझ्यासाठी पहिल्यांदाच घडतायेत. पहिल्यांदाच मी एका हलक्या – फुलक्या गाण्याला आवाज दिला आहे, पहिल्यांदाच मी या गाण्याच्या निमित्ताने स्क्रिन वर दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.” बिंग बींबरोबर काम करण्याच्या या पहिल्या-वहिल्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी व्हिडिओसाठी त्या निश्चित असल्या तरी अमितजींसारख्या दिग्गजाबरोबर काम कराण्याचं दडपण आल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र पुढे बोलताना अवघ्या काही शॉट्सनंतर अमितजींनी त्यांच्या वागण्यावरून हे दडपण बाजूला सारल्याची कबूलीही त्यांनी दिली. या गाण्याला संगीतकार जीत गागुंलीनी दिलंय तर याचे दिग्दर्शन अहमद खानने केले आहे.   

अमृता फडणवीस यांनी गाण्याचे दिग्दर्शक अहमद खान, संगीतकार जीत गांगुली यांचे कौतुक केले आहे. तसेच भूषण कुमार एक उत्तम निर्माते असल्याचे ही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित अमिताभ बच्चन यांनी केवळ सौ. फडणवीस यांच्यासाठी या व्हिडिओला होकार न दिल्याचे म्हणत कोणत्याही महिलेला नाही म्हणणे त्यांना कठीण जात असल्याची कबूली त्यांनी दिली. दरम्यान ही एक सुंदर अनुभूती असल्याचे म्हणत सौ. फडणवीस यांची इच्छाशक्ती आणि जिद्द या गाण्याला होकार देण्यासाठी पुरेशी असल्याचे, ते म्हणाले.

Web Title: Amitabh Bachchan and Amrita Fadnavis' new song 'Launch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.