आराध्याच्या बर्थ डे पार्टीत अमिताभ यांच्याकडे हट्ट धरून बसला शाहरूखचा अबराम खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 12:26 IST2017-11-20T06:53:48+5:302017-11-20T12:26:16+5:30

अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या वाढदिवसाचे काही फोटो ...

Amitabh Bachchan, Aaradhya's Birthday Party! | आराध्याच्या बर्थ डे पार्टीत अमिताभ यांच्याकडे हट्ट धरून बसला शाहरूखचा अबराम खान!

आराध्याच्या बर्थ डे पार्टीत अमिताभ यांच्याकडे हट्ट धरून बसला शाहरूखचा अबराम खान!

िताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. खुद्द अमिताभ बच्चन यांनी नातीच्या वाढदिवसाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन असे सगळे असले तरी यातील सगळ्यांत लक्ष वेधून घेणारा फोटो आहे अबराम खानचा. होय, शाहरूख खानचा मुलगा अबराम खान याचा. आपल्या क्यूट पापासोबत क्यूट  अबराम आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचला आणि त्याने एकच धम्माल केली. ‘बुड्ढी का बाल’साठी अबरामने असा काही हट्ट धरली की, खुद्द अमिताभ यांना अबरामचा हट्ट पुरवावा लागला.चक्क बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी अबरामला ‘बुड्ढी का बाल’ अर्थात कॉटन कँडी खावू घातली.  





ही कॉटन कँडी पाहून अबराम भलताच खूश झाला आणि लेकाच्या चेहºयावरचे हसू बघून शाहरूखही तितकाच खूश्श झाला. ‘हा तान्हुला ‘बुड्ढी का बाल’चा चाहता कोण? आम्ही त्याला स्टॉलवर घेऊन गेलो आणि त्याला एक कँडी तयार करून दिली. त्याच्या चेह-यावरचा आनंद अनमोल आहे...अबराम...ज्युनिअर शाहरूख...आनंददायी...’असे अमिताभ यांनी अबरामचा फोटो शेअर करताना लिहिलेय.






अमिताभ यांनी आराध्याच्या केक कटिंगचे काही फोटोही शेअर केले आहेत. यात आराध्या आपल्या आजीला म्हणजे जया बच्चन यांना केक भरवताना दिसते आहे. या पोस्टसोबत अमिताभ यांनी कॅप्शनही लिहिले आहे. ‘बर्थ डे गर्ल आपल्या वाढदिवशी जाम आनंदात आहे. नव्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. केक शेअर करतेय. सर्व कुटुंबाचा अभिमान...मुली नेहमीच..,’असे त्यांनी लिहिले आहे.

ALSO READ : ​असा साजरा झाला बच्चन कुटुंबाची ‘प्रिन्सेस’ आराध्याचा वाढदिवस!

या फोटोंवरून एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे आराध्या, अबराम हे सगळे स्टारकिड्स आपल्या मम्मी-पप्पापेक्षा लोकप्रीयतेच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत. एवढेच नाही तर अगदी आत्तापाासून कॅमेºयाची भाषाही या लहानग्यांना कळू लागली आहे. अबराम व आराध्या हे दोघे सुद्धा यात कुठेही कमी नाहीत.

 

Web Title: Amitabh Bachchan, Aaradhya's Birthday Party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.