आमिर-सनी एकत्र की अफवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 23:10 IST2016-04-03T05:34:12+5:302016-04-02T23:10:56+5:30
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, सनी लियोनसोबत त्याला चित्रपटात काम करायला आवडेल. तेव्हापासून दोघांच्या एकत्र ...

आमिर-सनी एकत्र की अफवा?
ब लिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, सनी लियोनसोबत त्याला चित्रपटात काम करायला आवडेल. तेव्हापासून दोघांच्या एकत्र चित्रपटाची चर्चा सुरू झाली. कोणत्या चित्रपटात हे दोघे काम करतील याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होते.
अशातच बातमी आली की, ‘डेल्ही बेली’ फेम दिग्दर्शक अभिनय देवच्या पुढच्या चित्रपटात आमिर-सनी काम करणार आहेत. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट असल्याचे सांगितले गेले. परंतु खुद्द आमिरने या बातमीला खोटे ठरवले.
‘लोकमत’ आयोजित ‘महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर’ या पुरस्कार सोहळ्यात जेव्हा आमिरला सनीसोबत काम करत असलेल्या चित्रपटाविषयी विचारले तेव्हा त्याने सांगितले की, असा कोणताही चित्रपट मी स्वीकारलेला नाही. पण जर भविष्यात असा प्रस्ताव आला तर मला नक्की त्यात काम करायला आवडेल.
काही महिन्यांपूर्वी टीव्ही चॅनलवर दिलेल्या वादग्रस्त मुलाखतीमध्ये सनीने जेव्हा आमिरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मुलाखत घेणाºया पत्रकाराने तिला विचारले की, पण आमिर तुझ्यासोबत काम करेल का? यावरून बराच वाद उफाळला होता.
आमिरला याबाबत विचारले असता तो स्वत: म्हणाला होता की, मी आवडीने सनीसोबत काम करेन.