स्टारकिड असूनही एकदम साधा राहतो आमिरचा लेक; रिक्षातून फिरतानाचा व्हिडिओ समोर, नेटकरी करत आहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 09:43 AM2024-04-24T09:43:33+5:302024-04-24T09:44:42+5:30

सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असलेला जुनैद रिक्षातून प्रवास करताना दिसला. जुनैदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

amir khan son junaid khan seen travelling in auto netizens praises him video viral | स्टारकिड असूनही एकदम साधा राहतो आमिरचा लेक; रिक्षातून फिरतानाचा व्हिडिओ समोर, नेटकरी करत आहेत कौतुक

स्टारकिड असूनही एकदम साधा राहतो आमिरचा लेक; रिक्षातून फिरतानाचा व्हिडिओ समोर, नेटकरी करत आहेत कौतुक

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची कमी नाही. अनेक स्टारकिड सोशल मीडिया सेन्सेशन आहेत. स्टारकिड त्यांची फॅशन, स्टाइल , लॅविश लिविंग यासाठी ओळखले जातात. पण, सध्या मात्र एका स्टारकिडच्या साधेपणाची चर्चा होत आहे. आमिर खानचा लेक जुनैद खानवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

वडील बॉलिवूडचे सुपरस्टार असूनही अगदी साध्या पद्धतीने जीवन जगणारा जुनैद खान चर्चेत आला आहे. नुकतंच जुनैदला स्पॉट करण्यात आलं. सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असलेला जुनैद रिक्षातून प्रवास करताना दिसला. जुनैदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

जुनैद लवकरच अभिनयात पदार्पण करणार आहे. 'महाराजा' या सिनेमातून तो पदार्पण करत आहे. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार असून यात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी जुनैदबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही व्हायरल झाले होते.

Web Title: amir khan son junaid khan seen travelling in auto netizens praises him video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.