आलिया भट्टला कळत नाही कसे करायचे बाथरुम साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 08:20 AM2017-01-28T08:20:49+5:302017-01-28T13:51:30+5:30

आलिया भट्ट एवढी गुणी अभिनेत्री असूनही तिच्या बुद्धीमत्तेची खिल्ली उडवली जाते. ‘कॉफी विथ करण’वर तिने दिलेल्या उत्तरामुळे आलिया इंटरनेट ...

Aliya Bhatt does not know how to clean the bathroom | आलिया भट्टला कळत नाही कसे करायचे बाथरुम साफ

आलिया भट्टला कळत नाही कसे करायचे बाथरुम साफ

googlenewsNext
िया भट्ट एवढी गुणी अभिनेत्री असूनही तिच्या बुद्धीमत्तेची खिल्ली उडवली जाते. ‘कॉफी विथ करण’वर तिने दिलेल्या उत्तरामुळे आलिया इंटरनेट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. तेव्हापासून आलिया मीडियाशी बोलताना होमवर्क करून येऊ लागली. जे तिला माहित नाही ते लगेच ती ‘गुगल’वर शोधते.

नुकतेच एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने एक अनपेक्षित गोष्ट शेअर केली. सध्या आलिया मुंबईत घेतलेल्या नव्या फ्लॅटमध्ये सेटल होत आहे. या नव्या घरातील बाथरुमच्या टाईल्स कशा स्वच्छ करायच्या हे तिला माहित नव्हते. आपले अज्ञान कोणाला कळू द्यायचे नाही म्हणून तिने गुगलवर त्याचा शोध घेतला.

ALSO READ: आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचा क्युटेस्ट फोटो!

तिने सांगितले की, ‘माझ्या नव्या घरातील बाथरुमध्ये षटकोनी आकाराच्या टाईल्स लावलेल्या आहेत. असेच एके दिवशी मी पाहिले की, या टाईल्सच्या कोपऱ्यामध्ये घाण जाम होऊ लागली. ती कशी साफ करायची हे मला कळेनाच. म्हणून मग मी गुगलवर शोधले की, षटकोनी आकाराच्या टाईल्सची स्वच्छता कशी करावी?’

मग तिला उत्तर मिळाले का? नाही. गुगलनेही आलियासमोर हात टेकले. अखेर तिची आईच तिच्या मदतीला धावून आली. आलिया आजकाल गुगलचा पुरेपुर वापर करतेय. तिने माहिती दिली की, ‘युरोपला गेले असताना मला डोसा खाण्याची खूप इच्छा झाली होती. डोसा कुठे मिळेल याचा गुगलवर शोध घेतला परंतु कुठेच मिळाला नाही.’ म्हणजे दोन्ही वेळेस गुगल आलियाच्या कामी आले नाही.

ALSO READ: आलियाचे न्यू इअर रेझ्युलेशन : जनावरांची सेवा करणे

याच मुलाखतीमध्ये तिने अक्षयकुमारचे नाव इंडस्ट्रीमधील सर्वात प्रामाणिक माणूस म्हणून घेतले. एवढेच नाही तर ती तिच्या बॉयफ्रेंडवर सतत पाळत ठेवून असते. तिचा बॉयफ्रेंड कोण हे जरी तिने सांगितले नसले तरी ती म्हणाली की, ‘मला माझ्या बॉयफे्रंडच्या मोबाईलचा पासवर्ड माहित आहे. मी त्याच्यावर नजर ठेवून असते.’ आलियाचे नाव सिद्धार्थ मल्होत्राशी जोडण्यात येते. दोघे नेहमी एकत्र दिसतात, एकत्र सुट्या घालवतात. आता आलिया त्याच्याविषयीच तर बोलत नाही ना? 

सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह राहणारी आलिया म्हणते की, मला इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना कॅप्शनमध्ये जास्त हॅशटॅग्स वापरायला आवडत नाही. दोनपर्यंत ठीक आहे; पण जे लोक लांबलचक हॅशटॅग्स देतात तसे मला नाही आवडत.

बरं तुमच्याकडे आलियासाठी ‘बाथरुमच्या टाईल्स स्वच्छ’ करण्याच्या काही टिप्स असतील तर त्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा.

Web Title: Aliya Bhatt does not know how to clean the bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.