/>'वे डींग पुलाव' चा ट्रेलर बॉलीवुड ची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्टने लॉन्च केला आहे. कारण या चित्रपटाद्वारे तिची लहानपणीची मैत्रीण अनुष्का रंजन बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. आपल्या या मित्रप्रेमापोटी आलियाने नुकतेच टष्द्वीट केले आहे की, 'हा अनुष्काचा पहिला चित्रपट आहे. यावर विश्वास बसत नाही, संपुर्ण चित्रपटात ती एखाद्या स्वप्नासारखी वावरते आहे. स्वीट एन्ड असलेला हा एक क्युट फॅमिली पुलाव आहे. तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट अवश्य पहावा.' विनोद प्रधान दिग्दर्शित या चित्रपटात दिगंथ मनचले, करण ग्रोव्हर आणि ऋषी कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. पुढच्या आठवड्यात आपल्या मैत्रिणीला 'शानदार' द्वारे टक्कर देण्यासाठी आलिया येतच आहे.
Web Title: Alia praises Anushka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.