आलियाने स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसाच्या चित्रीकरणाच्यावेळी मी पुन्हा चित्रपट करणार नाही असे ठरवले होते. काय घडले होते असे की, आलियाने हा निर्णय घेतला होता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 17:45 IST2016-11-16T17:45:55+5:302016-11-16T17:45:55+5:30
स्टुंडट ऑफ द इयर हा अालियाच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातील राधा तेरी... हे गाणे सगळ्यात पहिल्यांदा चित्रीत ...
आलियाने स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसाच्या चित्रीकरणाच्यावेळी मी पुन्हा चित्रपट करणार नाही असे ठरवले होते. काय घडले होते असे की, आलियाने हा निर्णय घेतला होता...
स टुंडट ऑफ द इयर हा अालियाच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातील राधा तेरी... हे गाणे सगळ्यात पहिल्यांदा चित्रीत करण्यात आले होते. या गाण्याच्या चित्रीकरणाच्यावेळी ती पहिल्यांदा कॅमेराच्या समोर गेली. या गाण्याचा चित्रीकरणाचा तिचा अनुभव हा अतिशय वाईट होता. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या आठवणी तिने नुकत्याच झलक दिखला जा कार्यक्रमाच्या सेटवर शेअर केल्या. ती डियर जिंदगी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात गेली होती. आलिया सांगते, "मी चांगली नर्तिका नाहीये. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाच्यावेळी तर मला अजिबातच नृत्य करायला जमत नव्हते आणि फराह खान या गाण्याची नृत्यदिग्दर्शिका होती. फरहा ही बॉलिवुडमधील अतिशय चांगल्या कोरिओग्राफर्सपैकी एक मानली जाते. त्यामुळे तिच्या तालावर नाचणे मला अजिबातच जमत नव्हते. नृत्य करताना माझा पायदेखील मुरगळला होता. त्यामुळे या गाण्याचे चित्रीकरण करणे मला खूपच कठीण जात होते. माझ्या आयुष्यातील हा दिवस खूपच वाईट होता. मी त्या दिवसाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा चित्रपटात कामच करायचे नाही असेच ठरवले होते. पण चित्रीकरण झाल्यानंतर अचानक शाहरुख खानने चित्रपटाच्या सेटवर येऊन आम्हाला सरप्राईज दिले होते. त्यावेळी त्याला पाहूनच माझा सगळा दिवसभराचा थकवा निघून गेला होता आणि त्यानेच मला त्यावेळी हार न मानता जास्तीत जास्त मेहनत करत राहावी असा सल्ला दिला होता. त्याच्या या सल्ल्यामुळेच मी अधिकाधिक मेहनत करायला शिकले. त्यामुळे तो माझा मार्गदर्शकच आहे असेच मी म्हणेन. केवळ त्याच्यामुळेच आज मी चित्रपटसृष्टी सोडली नाही असे मी आवर्जुन सांगेन."