रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत तिच्या काकांनी केला हा खुलासा, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:15 IST2019-07-24T17:08:11+5:302019-07-24T17:15:31+5:30
रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार सुरु आहे. पुढच्या वर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत अशी माहिती आहे

रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत तिच्या काकांनी केला हा खुलासा, वाचा सविस्तर
रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार सुरु आहे. पुढच्या वर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत अशी माहिती आहे. ऐवढेच नाही तर लग्नात आलिया सब्यासाचीने डिझाईन केलेला लहंगा परिधान करणार आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार आलियाचे काका मुकेश भट म्हणाले या सगळ्या चर्चा अफवा आहेत या चर्चांमध्ये काही तथ्य नाहीय. मुकेश भट यांच्या या वक्तव्यानंतर लग्नाच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. असे असेल तरी मात्र ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परत आल्यावर दोघांच्या लग्नाची तारीख फायनल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दोनही कुटुंबीयामध्ये जोरात लग्नाची तयारी सुरु आहे. आता ही गोष्ट वेळेच सांगेल की नक्की कधी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना आलिया म्हणते,‘ हे नाते नाही तर मैत्री आहे. हे मी पूर्णपणे प्रामाणिकपणे सांगते आहे. हे खूपच सुंदर आहे. मी सध्या आकाश आणि ताऱ्यांवर चालत आहे. आम्ही दोघे आहोत जे आपल्या प्रोफेशनल लाईफ लाही खुलेपणाने जगत आहोत.
आम्ही दोघेही आपापल्या चित्रपटांचे शूटिंग करत आहोत. हे असे काही क्षण आहेत ज्यात तुम्ही आम्हाला एकमेकांसोबत बघाल. हीच खरंतर एका सहज आणि सरळ नात्याची खुण आहे. नजर ना लागो.’ आलिया आणि रणबीर यांच्यातील नाते हे केवळ मैत्रीचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.