'मी फक्त तुझी प्रेमळ...'; लाडक्या बहिणीसाठी आलिया भटची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 07:36 PM2023-11-28T19:36:51+5:302023-11-28T19:48:23+5:30

आलियाने बहिणीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Alia Bhatt's special post for dear sister shaheen bhatt | 'मी फक्त तुझी प्रेमळ...'; लाडक्या बहिणीसाठी आलिया भटची खास पोस्ट

'मी फक्त तुझी प्रेमळ...'; लाडक्या बहिणीसाठी आलिया भटची खास पोस्ट

अभिनेत्री आलिया भटची बहिण शाहीन भट आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. आलियाने बहिणीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने शेअर केलेल्या फोटोंमधून दोघींमधील बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. शिवाय आलियाने शाहिनसाठी खास नोटही लिहली आहे.

आलियाने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहले, 'तू आनंद आहेस.. तू प्रकाश आहेस... तू वारा आहेस.. आपण कधी-कधी भांडतोही..तु गुडघ्यांची काळजी घेत जा. मी लेखक आणि मी कवीदेखील नाही. पण, मी फक्त तुझी प्रेमळ बहिण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा'. 

आलिया आणि शाहीन यांच्यामध्ये प्रेमळ नातं आहे. दोघी कायम एकत्र दिसतात. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात.  शाहीन अनेकदा आलियासोबत पार्टी आणि  कार्यक्रमांमध्ये दिसते. शाहीन ही अभिनेत्री नसून लेखिका आहे. शिवाय, ती आलियासोबत एक प्रोडक्शन हाऊस देखील चालवते.

आलिया आणि शाहीन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघी निर्माते महेश भट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या मुली आहे. सोनी राजदान या महेश भट यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. महेश भट यांचं पहिलं लग्न किरण भट यांच्यासोबत झालं होतं.

Web Title: Alia Bhatt's special post for dear sister shaheen bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.