आलिया भट्टच्या 'राजी'ची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम, आतापर्यंत इतक्या कोटींची झाली कमाई !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 11:58 IST2018-05-17T06:28:09+5:302018-05-17T11:58:09+5:30
बॉलिवू़डची चुलबुली गर्ल आलिया भट्टचा 'राजी'चा जलवा बॉक्स ऑफिसवर अजून कायम आहे. हा चित्रपट गत शुक्रवारी रिलीज झाला आहे. ...

आलिया भट्टच्या 'राजी'ची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम, आतापर्यंत इतक्या कोटींची झाली कमाई !
ब लिवू़डची चुलबुली गर्ल आलिया भट्टचा 'राजी'चा जलवा बॉक्स ऑफिसवर अजून कायम आहे. हा चित्रपट गत शुक्रवारी रिलीज झाला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी राजीने ७.५३ कोटी रुपयांची ओपनिंग करीत बॉक्स आॅफिसवर दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ होत ११.३० कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
चित्रपट आलियाने सहमत नामाच्या कश्मिरी मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात आलियाने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. पाकिस्तानात राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. आलियाचे अनेक रूप या चित्रपटात पाहायला मिळताहेत. एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत ती दिसतेयं. मेघनाचा हा चित्रपट हरिंद सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित आहे आलियाच्या नवऱ्याची भूमिका विक्की कौशलने साकारली आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारत-पाक संबंधावर आधारित आहे. ‘राजी’चे बहुतांश शूटींग काश्मीरात झाले आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आलियाने चित्रपटात कुठेच मेकअप केलेला नाही. आलियाला ‘राजी’ चित्रपटासाठी असे अनेक कोड्स पाठ करावे लागलेत. केवळ इतकेच नाही तर यातील अॅक्शन सीन्ससाठीही आलियाने विशेष ट्रेनिंग घेतले, डायव्हिंग शिकले. आलियाला जीप चालवता येत नव्हती. पण या चित्रपटासाठी ती जीप चालवायला शिकली. सोनी राजदान, जयदीप अहलावत आणि रजित कपूर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
ALSO READ : बॉलिूवडच्या ‘या’ अभिनेत्रीची आलिया भट्ट हिला करायचीय ‘हेरगिरी’! पण का, वाचा!