आलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:46 PM2021-01-28T14:46:51+5:302021-01-28T14:52:52+5:30

आलिया भट सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Alia bhatts new instagram post is going viral | आलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

आलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

googlenewsNext

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते. अलिकडेच आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलिया फोटोत नखं दाताखाली दाबताना दिसतेय आणि काहीशी गोंधळलेल्या अवस्थेत दिसतेय. आलियाचा हा खूप क्युट स्माईलवाला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


आलिया भट सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे.

गंगूबाई साठच्या दशकात मुंबई माफियाचे नाव मोठे होते. असे सांगितले जाते की तिच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांसाठी विकले होते. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात रुळली होती. 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट स्त्री केंद्रीत आहे आणि या चित्रपटाची कहाणी आलिया भटच्या अवतीभवती फिरते.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. याशिवाय आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' सिनेमात झळकणार आहे. तसेच दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमात दिसणार आहे. 
 

Web Title: Alia bhatts new instagram post is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.