​आलिया भट्टने मीडियाकडून घेतले ‘प्रेमी’बद्दलचे प्रॉमिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:07 IST2017-02-12T11:35:52+5:302017-02-12T17:07:57+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट ज्या कुणाशी चित्रपट करते, त्या को-स्टारशी तिचे नाव जोडले जाते. सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन ...

Alia Bhatt takes the media for a 'love'! | ​आलिया भट्टने मीडियाकडून घेतले ‘प्रेमी’बद्दलचे प्रॉमिस!

​आलिया भट्टने मीडियाकडून घेतले ‘प्रेमी’बद्दलचे प्रॉमिस!

लिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट ज्या कुणाशी चित्रपट करते, त्या को-स्टारशी तिचे नाव जोडले जाते. सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जून कपूर असे सगळेच या रांगेत आहेत. आलियाच्या लाईफमध्ये सिद्धार्थ असल्याचे म्हटले जाते. पण आलिया वा सिद्धार्थ या दोघांपैकी अद्याप कुणीही हे मान्य केलेले नाही. त्यामुळे आलियाचा ‘असली प्रेमी’ कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कदाचित याचमुळे लोकांना आणि मीडियालाही आलियाचा ‘प्रेमी’ कोण? हे जाणून घेण्यात अधिक रस आहे.
‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ या सिनेमातील ‘तू प्रेमी...आहा...मै प्रेमी...आहा...  ’ या रिमिक्स गाण्याच्या लॉन्चवेळी नेमके हेच घडले.



आलिया या गाण्याच्या लॉन्चिला वरूण धवनसोबत आली. मग सुरु झाला मीडियाच्या प्रश्नांचा ‘सिलसिला’. अपेक्षेनुसार, मीडियाने यावेळी आलियाला तिच्या ‘प्रेमी’बद्दल विचारले. पण आलियाच ती. इतक्या सहजी ती का सांगणार. तिने हा प्रश्न विचारणाºया मीडियाला अगदी नम्रपणे सुनावले. केवळ सुनावलेच नाही तर मीडियाकडून तसे प्रॉमिसही मागितले. ‘मला माझ्या प्रेमीबदद्ल प्लीज विचारू नका. तुम्ही(मीडियाला उद्देशून) मला प्रॉमिस करा’,असे आलिया या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाली. या प्रश्नाने मीडियाच्या आनंदावर विरजण पडले खरे पण, आलिया मात्र निश्चिंत झाली. नको असलेले प्रश्न कसे विनम्रपणे टाळायचे किंवा त्याला कशी बगल द्यायची, हेच आलिया शिकली म्हणायची.



अभिनेता संजय दत्त व धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या १९८९ साली रिलीज झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे सुपरहिट ठरले होते. या गाण्याला अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहिरी यांनी गायले होते. या गाण्यातील माधुरी दिक्षित व संजय दत्त यांच्या आगाळ्या वेगळ्या नृत्य शैलीने तर अनेकांना वेडच लावले होते. याच गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आलिया व वरूणच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या गाण्यासाठी माधुरीने आलिया व वरुणला डान्स शिकविलाय. माधुरी आलिया व वरूणला डान्स शिकवतानाचा याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल ठरला होता.

Web Title: Alia Bhatt takes the media for a 'love'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.