बॉयफ्रेंड रणबीर कपूरला भेटायला दिल्लीला पोहोचली आलिया भट, एअरपोर्टवर झाली स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 13:56 IST2021-01-29T13:48:46+5:302021-01-29T13:56:46+5:30
एअरपोर्टवर आलिया खूप स्टायलिश लूकमध्ये दिसली.

बॉयफ्रेंड रणबीर कपूरला भेटायला दिल्लीला पोहोचली आलिया भट, एअरपोर्टवर झाली स्पॉट
सेलिब्रिटी कपल आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासून लपलेले नाही. बर्याचदा हे दोघेही कुटूंब, मित्र आणि एकमेकांसमवेत हँग आउट करताना दिसतात. दोघांच्या लग्नाचीही चर्चा पाहायला मिळतात. अभिनेता रणबीर कपूर लव्ह रंजनच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्री आलिया भटही तिच्या शूटिंगमधून ब्रेक घेत दिल्लीला पोहोचली आहे.
आलिया भट आधी मुंबई आणि नंतर दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट झाली. एअरपोर्टवर आलिया खूप स्टायलिश लूकमध्ये दिसली. आलियाने व्हाईट रंगाचे टॉप आणि डोळ्यांवर ट्रेंडी सनग्लास अशा ग्लॅमरस अंदाजत दिसली.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आलिया नुकतीच हैदराबादहून दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून परत आली आहे. यापूर्वी आलियाने संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचे शूटिंगही पुन्हा सुरू केले आहे.
दरम्यान, आलियाची तब्येत बिघडल्यामुळे तिलाही एक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता आलिया बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करण्यासाठी दिल्लीला गेली आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. याशिवाय आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' सिनेमात झळकणार आहे.