प्लॅस्टिक विरोधातील सर्वात मोठ्या लढाईसाठी आलिया भट्ट ‘राजी’, अर्जुन कपूरचाही ‘एलान-ए-जंग’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 20:18 IST2018-06-03T14:45:29+5:302018-06-03T20:18:52+5:30

येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार असून, त्या पार्श्वभूमीवर जगभरात प्लॅस्टिक विरोधात एक प्रकारचा लढा ...

Alia Bhatt 'Razi' for the biggest fight against plastic, Arjun Kapoor's 'Elaan-e-Jung'! | प्लॅस्टिक विरोधातील सर्वात मोठ्या लढाईसाठी आलिया भट्ट ‘राजी’, अर्जुन कपूरचाही ‘एलान-ए-जंग’!

प्लॅस्टिक विरोधातील सर्वात मोठ्या लढाईसाठी आलिया भट्ट ‘राजी’, अर्जुन कपूरचाही ‘एलान-ए-जंग’!

त्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार असून, त्या पार्श्वभूमीवर जगभरात प्लॅस्टिक विरोधात एक प्रकारचा लढा दिला जात आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी यामध्ये भाग घेत आहे. बॉलिवूडमध्ये या अभियानाची सुरुवात अभिनेत्री आलिया भट्ट हिने केली असून, सोशल मीडियावर #BeatPlasticPollution या नावाने कॅम्पेनही चालविले जात आहे. 

आलियाने प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर बहिष्कार टाकण्यासाठी लोकांना प्रेरित करताना एक ट्विट केले. ट्विटमध्ये तिने लिहिले की, ‘प्लॅस्टिकला पराभूत करण्यासाठी आजपासूनच स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करायला सुरुवात करा. कारण प्लॅस्टिकच्या बाटल्या नष्ट करण्यासाठी ४५० किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष लागतात. तोपर्यंत या बाटल्या पर्यावरणाचा ºहास करतात. मी माझ्या आयुष्यातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. अपेक्षा करते की, तुम्हीही एक पाऊल पुढे टाकणार.’
 
यावेळी आलियाने अभिनेता वरुण धवन, अर्जुन कपूर आणि सोनम कपूरला हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी नॉमिनेट केले. आलियाच्या या चॅलेंजचा स्वीकार करताना अर्जुनने प्लॅस्टिक बाटल्यांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवातही केली. त्याने एका स्टीलच्या बाटलीसोबत फोटो शेअर करताना लिहिले की, प्लॅस्टिकला हरविण्यासाठी केवळ एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. मी प्लॅस्टिकच्या बाटलीऐवजी धातूच्या बाटलीचा स्वीकार केला आहे. या बाटल्या सुविधाजनक आणि पर्यावरणमित्र आहेत.’ यावेळी अर्जुनने अभिनेत्री अनुष्का शर्मा, रणवीर सिंग आणि परिणिती चोपडालाही हे चॅलेंज दिले आहे. 
 }}}} ">It takes one small step to #BeatPlasticPollution! I’ve replaced using plastic bottles with a metal one. It’s convinient & environment friendly. Tagging @AnushkaSharma@RanveerOfficial & @ParineetiChopra to take up the challenge & inspire others to choose a sustainable future. pic.twitter.com/JNWbIgiVU8— Arjun Kapoor (@arjunk26) June 3, 2018
दरम्यान, हॉलिवूडमध्ये प्लॅस्टिकपासून होणाºया प्रदूषणाविरोधात काही दिवसांपूर्वीच लढा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हॉलिवूड सुपरस्टार अर्नोल्ड श्वार्जनेगरने या कॅम्पेनला सपोर्ट करताना प्लॅस्टिकला पूर्णपणे टर्मिनेट करण्याचे आवाहन केले आहे. त्याने एक व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले की, ‘मी माझ्या घरातील प्लॅस्टिकचे चमचे नष्ट करीत आहे.’ यावेळी अर्नोल्डने लियोनार्दो डिकॅपरियोला या चॅलेंजसाठी नॉमिनेट केले आहे. 
 }}}} ">Thank you @PEspinosaC for tagging me in. We have already terminated the plastic bags, so to #BeatPlasticPollution, I’m terminating plastic spoons at home. @LeoDiCaprio@Regions20 and @GovArnoldUSC: Tag, you're it! https://t.co/OJ1aBP87bnpic.twitter.com/gZApfwbDA4— Arnold (@Schwarzenegger) May 30, 2018
यंदा जागतिक पर्यावरण दिन ‘प्लॅस्टिक बॅन’ या थीमवर सेलिब्रेट केला जाणार आहे. ज्याकरिता भारताने पुढाकार घेतला आहे. या थीमच्या माध्यमातूनच बीट प्लॅस्टिक पॉल्यूशन कॅम्पेन चालविले जाणार आहे. 

Web Title: Alia Bhatt 'Razi' for the biggest fight against plastic, Arjun Kapoor's 'Elaan-e-Jung'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.