आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण?
By देवेंद्र जाधव | Updated: March 1, 2025 15:42 IST2025-03-01T15:41:49+5:302025-03-01T15:42:11+5:30
आलियाने तिची लेक राहाचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे कारण?

आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण?
आलिया भटही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. 'स्टूडंट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या आलियाने (alia bhatt) आजवर अनेक सिनेमांमधून ती किती उत्तम अभिनेत्री आहे हे सिद्ध केलंय. आलिया आणिरणबीर कपूरची (ranbir kapoor) लेक राहाची बी टाऊनमध्ये चर्चा असते. आलिया आणि राहा (raha kapoor) ही मायलेकीची जोडी अनेकदा बाहेर एकत्र दिसतात. निरागस राहा अनेकदा पापाराझींना 'हाय हॅलो' करताना दिसते. पण नुकतंच आलियाने राहाचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले आहेत. काय आहे कारण?
आलियाने राहाचे सर्व फोटो केले डिलीट
आलियाने नुकतंच सोशल मीडियावर ज्या फोटोंमध्ये राहाचा चेहरा दिसतोय ते सर्व फोटो डिलीट केले आहेत. इतकंच नव्हे आलिया यापुढे राहाचा चेहरा दाखवणारा एकही फोटो पोस्ट करणार नाही, असंही सांगण्यात येतंय. एकूणच कुटुंबाच्या आणि मुलांच्या प्रायव्हसीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आलियाने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी पापाराझी जेव्हा आलियाच्या घराबाहेर उभे होते तेव्हाही आलिया त्यांना राहाचे फोटो न काढण्याची विनंती करताना दिसली.
सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे घेतला निर्णय?
काहीच दिवसांपूर्वी चोराने घरात घुसून सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. सुदैवाने सैफ यातून बचावला तरीही त्याला ऑपरेशन करावं लागलं. या दुर्देवी घटनेतून खान-कपूर कुटुंब सावरत आहे. या हल्ल्यामुळे कुटुंबाची सेफ्टी आणि इतर गोष्टींना डोळ्यासमोर ठेऊन आलियाने राहाचे सर्व फोटो डिलीट करण्याचा निर्णय घेतला. एक आई म्हणून आलियाने जो निर्णय घेतला यामुळे तिचं कौतुक होतंय. नेटकऱ्यांनी तिच्या निर्णयाला समर्थन दिलंय.