‘सडक’च्या रिमेकमध्ये संजय दत्तसोबत दिसणार आलिया भट्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 21:59 IST2017-03-28T16:29:27+5:302017-03-28T21:59:27+5:30
संजय दत्त आणि पूजा भट्ट यांचा ‘सडक’ या चित्रपटाचा रिमेक बनविण्यावरून सध्या इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. चित्रपटाची नायिका ...

‘सडक’च्या रिमेकमध्ये संजय दत्तसोबत दिसणार आलिया भट्ट!
स जय दत्त आणि पूजा भट्ट यांचा ‘सडक’ या चित्रपटाचा रिमेक बनविण्यावरून सध्या इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. चित्रपटाची नायिका अन् आता दिग्दर्शक बनलेल्या पूजाने याबाबत हिट दिल्याने ‘सडक’च्या रिमेकमध्ये कोणाची वर्णी लागेल याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
१९९१ मध्ये आलेल्या ‘सडक’मुळे संजय दत्तला रातोरात स्टारडम मिळवून दिले होते. डीएनएच्या रिपोर्टनुसार संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या मुलीच्या रूपात आलिया भट्ट हिचे नाव पुढे आले आहे. यावेळेस चित्रपटाची कथा संजय दत्तवर आधारित असेल. जो आपल्या मुलीला वाचविण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करीत असतो. मात्र याबाबत अद्यापपर्यंत आलिया किंवा संजूबाबाकडून कुठल्याही प्रकारचे संकेत मिळाले नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी साशंकता आहे.
![]()
परंतु पूजा भट्ट हिची चित्रपटाबाबतची उत्सुकता पाहता ‘सडक’च्या रिमेकची निर्मिती करण्याचे जवळपास निश्चित असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, आलिया भट्ट हिला बॉलिवूडमध्ये अनेक निर्मात्यांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे बहुतांश चित्रपटांमध्ये तिच्या नावाची चर्चा होत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक बिजनेस केला. त्याचबरोबर आगामी सुपर नॅचरल थ्रिलर ‘ड्रॅगन’ या चित्रपटाबाबतही ती खूप उत्साहित दिसत आहे. ज्यात ती रणबीर कपूर याच्यासोबत बघावयास मिळणार आहे.
त्याचबरोबर ती जोया अख्तर हिच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातही काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तिच्यासोबत रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे बिझी शेड्यूल्ड असलेली आलिया ‘सडक’च्या रिमेकबाबत कितपत उत्सुक आहे. याविषयी मात्र तर्कवितर्क लावले जात आहेत.