आलिया भटची 'ही' बहिण या कारणामुळे आहे बॉलिवूडपासून दूर, वाचा सविस्तर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:35 IST2019-03-15T16:34:00+5:302019-03-15T16:35:00+5:30

बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे. त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही.

Alia Bhatchi 'This' sister is due to this, away from Bollywood, read more detail! | आलिया भटची 'ही' बहिण या कारणामुळे आहे बॉलिवूडपासून दूर, वाचा सविस्तर !

आलिया भटची 'ही' बहिण या कारणामुळे आहे बॉलिवूडपासून दूर, वाचा सविस्तर !

महेश भट्ट हे बॉलीवुडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक. आजवर अनेक हिट सिनेमा भट्ट कॅम्पने दिले आहेत. महेश भट्ट यांच्या लेकींनीही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांना बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. कॉलेजमध्ये असताना महेश भट्ट यांनी वयाच्या विसाव्या वर्षी लोरिएन ब्राईट नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर महेश भट्ट यांनी लोरिएनचं नाव किरण भट असं केलं. महेश आणि किरण यांची दोन मुलं आहेत. एक पूजा भट आणि दुसरा राहुल भट. यानंतर महेश भट्ट यांचे सोनी राजदान यांच्याशी सूत जुळले.

महेश आणि सोनी राजदान यांच्या दोन लेकी असून एकीचं नाव शाहिन तर दुसरीचे नाव आलिया भट असं आहे. 1988 साली शाहिनचा जन्म झाला.वयाच्या तेराव्या वर्षी शाहिन डिप्रेशनमध्ये गेली. एका मुलाखतीमध्ये आलियानं याबाबत कबुली दिली होती. डिप्रेशनसह निद्रानाश या आजाराने शाहिन त्रस्त होती. शाहिन कधीही अभिनय करताना दिसली नाही. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे. त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. 

Web Title: Alia Bhatchi 'This' sister is due to this, away from Bollywood, read more detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.