रणबीर कपूरच्या प्रेमात पडून फसली आलिया भट, तिला सोडावे लागेल का फिल्मी करियर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 17:31 IST2018-11-07T17:30:42+5:302018-11-07T17:31:16+5:30
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अालिया भट यांच्या अफेयरची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

रणबीर कपूरच्या प्रेमात पडून फसली आलिया भट, तिला सोडावे लागेल का फिल्मी करियर ?
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अालिया भट यांच्या अफेयरची चर्चा सगळीकडे रंगली आहे. सोशल मीडियावर त्या दोघांचे नाते लवकरच एका नव्या वळणावर येणार असून ते दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. कदाचित याच कारणामुळे बऱ्याच कालावधीपासून रणबीरच्या कुटुंबासमवेत आलिया दिसते आहे. मात्र या नात्यामुळे कदाचित आलिया भटला फिल्मी करियर सोडावे लागू शकते, याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरुन आहेत. अशात अनेकदा आलियाला कपूर कुटुबियांसोबत स्पॉटदेखील केले गेले आहे. त्यामुळे, लवकरच आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असले तरीही कपूर कुटुंबियांच्या एका प्रथेमुळे आलियाच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. या कुटुंबातील स्त्रिया लग्नानंतर चित्रपटांत काम करणे सोडून देतात. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग आणि रणधीर कपूर यांची पत्नी बबीता यांनादेखील याच कारणामुळे चित्रपटसृष्टीला रामराम ठोकावा लागला. अशात आता आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतर आलियादेखील चित्रपटसृष्टीत काम न करण्याचा निर्णय घेईल का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आलिया आपले हे करिअर सुरुच ठेवणार आहे. कारण शशी कपूर यांची पत्नी जेनिफर आणि शम्मी कपूर यांची पत्नी गीता बालीनेदेखील लग्नानंतरही आपले करिअर सुरु ठेवले होते. आता आलिया नक्की काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.