​अक्षयची सेल्फी विद सलमा हायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 10:34 IST2016-03-15T17:34:33+5:302016-03-15T10:34:33+5:30

बॉलिवूड आणि हॉलिवूडचे अलीकडे खूपच जमायला लागले आहे. प्रियंका व दीपिका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. दुसरीकडे काही बॉलिवूड कलाकार ...

Akshaye Selfie with Salma Haik | ​अक्षयची सेल्फी विद सलमा हायक

​अक्षयची सेल्फी विद सलमा हायक


/>बॉलिवूड आणि हॉलिवूडचे अलीकडे खूपच जमायला लागले आहे. प्रियंका व दीपिका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. दुसरीकडे काही बॉलिवूड कलाकार हॉलिवूडशी मैत्री करण्यात बिझी आहेत. दुबईच्या एका कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार याची हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायक हिच्याशी भेट झाली आणि मग काय, सलमासोबत सेल्फी घेण्याचा मोह अक्षयला आवरता आला नाही. ही सेल्फी अक्षयने लगेच टिष्ट्वटरवर शेअर केला. याखाली त्याने लिहिले, ‘ सेल्फी आॅफ ए लाइफटाइम...दुनिया भर के सभी शिक्षकों के प्रति सम्मान..... दुबई में शिक्षक सम्मान समारोह ... सलमा हायक.....’
ग्लोबल टीचर प्राईज-२०१६ या कार्यक्रमात एका शिक्षकास दहा लाख अमेरिकन डॉलरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यास आॅस्कर विजेता मॅथ्यू मॅक्कनागे, बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन, परिणीति चोपडा आणि अली जाफर आदी उपस्थित होते. परिणीतिनेही मॅक्कनागेसोबत आपले एक छायाचित्र टाकले आहे. यात अक्षय आणि अभिषेक दोघेही दिसताहेत.

Web Title: Akshaye Selfie with Salma Haik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.