​अक्षय कुमारची विनंती; ‘लौटा दो लोटा पार्टी को’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 14:09 IST2017-06-08T08:27:42+5:302017-06-08T14:09:15+5:30

अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट येतोय. हा चित्रपट केवळ एक चित्रपट नाही तर स्वच्छता अभियान आणि ...

Akshay Kumar's request; 'Return to the Lotus Party' !! | ​अक्षय कुमारची विनंती; ‘लौटा दो लोटा पार्टी को’!!

​अक्षय कुमारची विनंती; ‘लौटा दो लोटा पार्टी को’!!

्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट येतोय. हा चित्रपट केवळ एक चित्रपट नाही तर स्वच्छता अभियान आणि उघड्यावर शौचास बसणाºयांविरोधातील एक मोहिम आहे. ट्रेलर रिलीजची तारीख  अक्षय कुमारने ज्या आक्रमक व रचनात्मक पद्धतीने सोशल मीडियावर जाहीर केली, ते पाहून तरी असेच वाटतेय.



अक्षयने स्वत:च्या टिष्ट्वटर अकाऊंटवर चित्रपटाचे एक नवे टीजर पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये काही महिला हातात ‘लोटा’ घेऊन जात आहेत. ‘लोटा पार्टी इज कमिंग युअर वे’, असे या पोस्टरवर लिहिले आहे. या पोस्टरला अक्षयने एक कॅप्शनही दिले आहे. ‘एक विनंती...लौटा दो लोटा पार्टी को...’असे अक्षयने लिहिले आहे. येत्या तीन दिवसात ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’चा ट्रेलर येणार असल्याचेही अक्षयने जाहिर केले आहे.



यापूर्वीही अक्षयने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्यात एक ‘सरसों का खेत’ तेवढे दाखवले गेले होते आणि यावर लिहिले गेले होते, ‘नेचर इज नॉट अ टॉयलेट’.


गत ६ जूनला असेच एक मोठा मतितार्थ असलेले पोस्टर जारी करून अक्षयने ट्रेलर रिलीजचे काऊंटडाऊन सुरु केले होते. हे पोस्टर पाहून गाव, रेल्वेस्टेशन, सिंगल स्क्रिन थिएटर अशा सगळ्यांची आठवण झाल्यावाचून तुम्हाला राहणार नाही. एकंदर काय, तर अक्षय चित्रपटांच्या पोस्टरसोबत एक मोठा संदेशही देतो आहे. हा संदेश तुम्ही आम्ही मनावर घ्यावा, शेवटी हाच तर अक्षयचा उद्देश आहे.
खरे तर ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हे अजब नाव अक्षयने आपल्या चित्रपटासाठी निवडले तेही याचमुळे. अनेकांनी त्याला चित्रपटाचे हे शीर्षक बदलण्याचा सल्ला दिला होता. पण अक्षयला हेच शीर्षक हवे होते.

Web Title: Akshay Kumar's request; 'Return to the Lotus Party' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.