​दिशा पटनीला लागली अक्षय कुमारच्या चित्रपटाची लॉटरी; पण आहे एक अडचण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 15:15 IST2018-04-01T09:45:43+5:302018-04-01T15:15:43+5:30

आत्ता आत्तापर्यंत टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड (?) एवढीच काय ती दिशा पटनीची ओळख होती. पण याचदरम्यान टायगरसोबत ‘बागी2’ करण्याची संधी ...

Akshay Kumar's film lottery; But there is a problem !! | ​दिशा पटनीला लागली अक्षय कुमारच्या चित्रपटाची लॉटरी; पण आहे एक अडचण!!

​दिशा पटनीला लागली अक्षय कुमारच्या चित्रपटाची लॉटरी; पण आहे एक अडचण!!

्ता आत्तापर्यंत टायगर श्रॉफची गर्लफ्रेन्ड (?) एवढीच काय ती दिशा पटनीची ओळख होती. पण याचदरम्यान टायगरसोबत ‘बागी2’ करण्याची संधी दिशाला मिळाली आणि  हा चित्रपट दिशासाठी भाग्याचा ठरला. होय, भाग्याचा ठरला असेच म्हणावे लागेल. कारण ‘बागी2’ने पहिल्याचं दिवशी २५.१० कोटींची कमाई करत, बॉक्सआॅफिसवर धम्माल उडवली. शिवाय‘बागी2’ रिलीज होतो ना होतो, तोच दिशाला आणखी एका बड्या चित्रपटाची आॅफर मिळाली. होय, दिशाला अक्षय कुमार स्टारर ‘हाऊसफुल4’ची आॅफर मिळाल्याचे कळतेयं. खरे सांगायचे तर आधी आम्हालाही या बातमीवर विश्वास बसेना. कारण यातील लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून क्रिती सॅननचे नाव कधीचेच फायनल झाले आहे. पण थोडी आणखी माहिती काढल्यावर दिशाला मिळालेली ही आॅफर लीड अ‍ॅक्ट्रेसची नसून सेकंड लीड अ‍ॅक्ट्रेसची असल्याचे आम्हाला कळले. केवळ इतकेच नाही तर अद्याप दिशाने ही आॅफर स्वीकारलेली नाही, हेही कळले. सूत्रांचे मानाल तर या चित्रपटाला होकार द्यावा की नाही, अशा संभ्रमात दिशा सापडली आहे. कारण अर्थातच क्रिती सॅनन. ‘हाऊसफुल4’मध्ये दिशा नाही तर क्रिती अक्षय कुमारच्या अपोझिट दिसणार आहे. साहजिकचं सगळा प्रकाशझोत क्रिती सॅननवर असणार आहे. म्हणजे सगळे श्रेय क्रिती घेऊन जाईल, अशी चिंता दिशाला म्हणे सतावते आहे. याचमुळे तिने अद्याप ‘हाऊसफुल4’ला होकार दिलेला नाही. 

ALSO READ : टायगर श्रॉफ व दिशा पटनीच्या ‘लव्ह लाईफ’मध्ये ‘बागी2’चे वादळ?

२०१५ मध्ये दिशा   कॅडबरीच्या जाहिरातीत  झळकली होती. यानंतर पुढच्याच वर्षी एका तेलगू सिनेमात तिची वर्णी लागली. यानंतर दिशाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यापश्चात इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये ती दिसली होती.

Web Title: Akshay Kumar's film lottery; But there is a problem !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.