अक्षय कुमारच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गोल्डचे पोस्टर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:43 IST2017-09-09T05:08:27+5:302017-09-09T10:43:39+5:30

जन्मदिवसाचे औचित्य साधत अक्षय कुमारे आपल्या फॅन्ससाठी आगामी चित्रपट गोल्डचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरवर गोल्डन ...

Akshay Kumar's birthday celebrates Gold Poster Out! | अक्षय कुमारच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गोल्डचे पोस्टर आऊट !

अक्षय कुमारच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गोल्डचे पोस्टर आऊट !

्मदिवसाचे औचित्य साधत अक्षय कुमारे आपल्या फॅन्ससाठी आगामी चित्रपट गोल्डचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरवर गोल्डन रंगाचे नणे आहेत. ज्यात बॅकग्राऊंडला अक्षयचा फोटो आहे.  


ALSO READ : ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या प्रोमोची अक्षय कुमारने अशी केली होती तयारी

गोल्ड चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करते आहे. हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू झाली आहे. चित्रपटाच्या सेटवरचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. छोट्या पडद्यावरील नागीण फेम मौनी रॉय हि याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात अक्षयचा 2.0 चित्रपट रिलीज होणार आहे. ज्यात त्याच्या सोबच रंजनीकांत आणि एमी जॅक्शन दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा अक्षय कुमार आणि रजनीकांत पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहे. नुकता 2.0 चा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमार 'पॅडमॅन' चित्रपटाच्या कामात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला अक्षयचा टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजून गल्ला जमावतो आहे. गेल्या काही वर्षांत अक्षयच्या फॅन्सच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर एका मागोमाग एक हिट चित्रपट देतो आहे.    

Web Title: Akshay Kumar's birthday celebrates Gold Poster Out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.