अक्षय कुमार आगामी सिनेमात साकारणार डबल रोल, शाहरुख खानच्या 'पठाण' देणार टक्कर

By गीतांजली | Published: December 8, 2020 03:00 PM2020-12-08T15:00:00+5:302020-12-08T15:00:03+5:30

या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे.

Akshay kumar will play double role in this film will compete with shahrukhs film pathan | अक्षय कुमार आगामी सिनेमात साकारणार डबल रोल, शाहरुख खानच्या 'पठाण' देणार टक्कर

अक्षय कुमार आगामी सिनेमात साकारणार डबल रोल, शाहरुख खानच्या 'पठाण' देणार टक्कर

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ सिनेमा अक्षय कुमारचा पुढील सिनेमाशी स्पर्धा करणार आहे. शाहरुख खान ‘पठाण’ सिनेमात डबल रोल करणार आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारही आपल्या आगामी सिनेमात डबल रोल करताना दिसणार आहे. अक्षय कुमारचा सायन्स फिक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे. 


हिंदी चित्रपटात वास्तविक कथा दाखविण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रत्येक कलाकारालासुद्धा या वास्तविक कथांचा एक भाग व्हायचा असते. अक्षय कुमार नेहमीच बॉलिवूडमध्ये काहीतरी वेगळे करण्यासाठी ओळखला जातो. अक्षय कुमार आपल्या चित्रपटांसाठी आणि आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. अक्षय कुमार पुन्हा एकदा सिनेमात डबल रोल करताना दिसणार आहे.

 


जसजसा काळ बदलला त्याचप्रमाणे चित्रपटांमध्येही नाविन्य पाहायला मिळत आहे. यापूर्वी चित्रपटांमध्ये डबल रोल दिसले होते. पण आता दुहेरी पात्रे कमी दिसली आहेत. अक्षय कुमारच्या नाव सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या 'अतरंगी रे' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पहिल्यांदा, अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या सिनेमाला ए.आर. रहमान संगीत देणार आहे.

Web Title: Akshay kumar will play double role in this film will compete with shahrukhs film pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.