पॅडमॅननंतर साऊथच्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार अक्षय कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 10:24 IST2018-01-30T04:54:18+5:302018-01-30T10:24:18+5:30

सध्या बॉलिवूडचा खिलाडी कुमार त्याचा आगामी चित्रपट पॅडमॅनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पॅडमॅननंतर अक्षय कुमार साऊथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. ...

Akshay Kumar will appear in the remake of South of the film after Paddman | पॅडमॅननंतर साऊथच्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार अक्षय कुमार

पॅडमॅननंतर साऊथच्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार अक्षय कुमार

्या बॉलिवूडचा खिलाडी कुमार त्याचा आगामी चित्रपट पॅडमॅनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पॅडमॅननंतर अक्षय कुमार साऊथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. साऊथचा सुपरहिट चित्रपट कंचना 2 च्या हिंदी रिमेकमध्ये तो काम करणार आहे. ट्रेड एक्सपर्ट रमेश बालाने ट्विटरच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे. अक्षय कुमार 2015मध्ये आलेल्या कंचना 2 च्या रिमेक तयार करणार आहे. या चित्रपटात तिची अभिनेत्री कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही.  
  कंचना 2 हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या आधी अक्षय कुमारने अशा प्रकारच्या भूल-भुल्लैया या चित्रपटात काम केले आहे. अक्षयने स्वत: इफ्फी 2017मध्ये भूल-भुल्लैया सारख्या चित्रपटात काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्याला हॉरर कॉमेडी जॉनर चित्रपटात काम करायला आवडते.

अक्षय कुमारचे हे वर्ष खूपच व्यस्त दिसते आहे. पॅडमॅननंतर त्याचा 2.0 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय बरोबर रजनीकांत असणार आहेत. याच वर्षी 15 ऑगस्टला गोल्ड चित्रपटही रिलीज होणार आहे. या चित्रपटातून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.  हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे.  

ALSO READ : अक्षयकुमार पत्नी ट्विंकल खन्नाच्या नव्हे तर ‘या’ सौंदर्यवतीच्या इशाऱ्यावर नाचतो!

तर पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. आधी हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र बॉक्स ऑफिसवरील क्लैशेस टाळण्यासाठी अक्षय कुमाराने चित्रपटाची डेट पुढे ढकलली.   

Web Title: Akshay Kumar will appear in the remake of South of the film after Paddman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.