'या' कारणामुळे अनेक दिवस अक्षय कुमार होता बहिणीवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 13:54 IST2017-06-26T08:24:41+5:302017-06-26T13:54:41+5:30

खिलाडी कुमार म्हणजेच अर्थात अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला एक प्रसिद्ध चेहरा आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षयचे चित्रपट सुपरहिट होतात. बॉक्स ...

Akshay Kumar was angry with the sister for many days because of this reason | 'या' कारणामुळे अनेक दिवस अक्षय कुमार होता बहिणीवर नाराज

'या' कारणामुळे अनेक दिवस अक्षय कुमार होता बहिणीवर नाराज

लाडी कुमार म्हणजेच अर्थात अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला एक प्रसिद्ध चेहरा आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षयचे चित्रपट सुपरहिट होतात. बॉक्स ऑफिसवरील कमाईबाबत अक्षय कुमार बॉलिवूडमधील तीन ही खानांना टक्कर देतो.  लवकरच अक्षय कुमारचा टॉयलेट- एक प्रेम कथा हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट ही 100 कोटींचा गल्ला करेल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे. अक्षयच्या व्यक्तीक आयुष्याशी निगडीत आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत.  

अक्षयची लहान बहिण अलका भाटियाने आपल्यापेक्षा वयाने 15 वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत विवाह केला आहे. अलका वयाच्या 40 व्या वर्षी बिझनेसमॅन सुरेंद्र हीरानंदानीसोबत विवाह बंधनात अडकली आहे. सुरेंद्र हा एका कंस्ट्रक्शन कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. अक्षय कुमारचा या लग्नाला विरोध होता. आपल्या छोट्या बहिणीवर अक्षय खूप नाराज होता. अलका पेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत तो तिचा विवाह लावून देण्यास तयार नव्हता. मात्र बहिणीच्या हट्टापुढे त्याचा काहीच चालले नाही.  त्यांने आपल्या बहिणीचा विवाह सुरेंद्र हीरानंदानीसोबत लावून दिले. सुरेंद्राचा हा दुसरा विवाह होता. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगीदेखील आहे. 2011 मध्ये सुरेंद्रने आपली पहिली पत्नी प्रितीसोबत घटस्फोट घेतला.  यानंतर 2012 मध्ये अलका आणि सुरेंद्र विवाहबंधनात अडकले. अक्षयची बहिण अलका हि नहेमीच बॉलिवूडच्या झगमगाटापासून  दूर राहिली आहे. गेल्या रक्षाबंधनला सोशल मीडियावर अक्षय कुमारने अलका सोबतचा एक फनी व्हिडिओ शेअर केला होता. ज्याला खपू लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या होत्या.

Web Title: Akshay Kumar was angry with the sister for many days because of this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.